घरताज्या घडामोडीRaj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडवर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी साधणार...

Raj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडवर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

Subscribe

भाजपसोबत युतीची चर्चा राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर सुरु झाली होती. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी भाजप मनसे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मनसेच्या मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात येईल. तसेच या निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात येईल. यापू्र्वी राज ठाकरे यांनी ऑक्टोबर महिन्यात मेळावा आयोजित केला होता परंतु प्रकृती बिघडल्यामुळे मेळावा रद्द करण्यात आला होता. आता मुंबई, नाशिक, पुणे, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित असतील.

आगामी महापालिका निवडणुका येत आहेत. ज्या ठिकाणी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे संवाद साधणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्याआधीपासून मनसेनं तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे यांनी नाशिकमधून सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या राज यांनी बैठका घेतल्या होत्या यानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. परंतु मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला नाही. यासाठी राज ठाकरेंनी मेळावा आयोजित केला होता परंतु ऐनवेळी तो रद्द करण्यात आला होता.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती काय असावी, काय मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे, त्या प्रमाणे भाजपसोबत मनसे जाणार का नाही? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांचे उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मेळाव्यात देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे मेळाव्यात काय बोलणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. भाजपसोबत युतीची चर्चा राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर सुरु झाली होती. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी भाजप मनसे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

प्रकृती बिघडल्यामुळे रद्द केली होता मेळावा

मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे ऑक्टोबरमध्ये संवाद साधणार होते. यासाठी भांडूपमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे हा पदाधिकारी मेळावा आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा : युवासेनेच्या दणक्यानंतर २० दिवस अडकवलेल्या नवजात बालकाला डिस्चार्ज; नऊ लाखांचे बील माफ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -