घरमहाराष्ट्रराज ठाकरे म्हणजे एन्टरटेंनमेंट

राज ठाकरे म्हणजे एन्टरटेंनमेंट

Subscribe

राज ठाकरे म्हणजे एन्टरटेंनमेंट आहे; पण असे म्हटल्यामुळे त्यांना राग तर येणार नाही ना, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांबद्दल भाष्य केेले आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज ठाकरे म्हणजे एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट आणि एन्टरटेनमेंट आहेत. मात्र त्याच वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ‘मोठे भाऊ’ असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या वयातही ज्या ताकदीने काम करत आहेत ते पाहून, ‘अभी तो मैं जवान हूँ,’ असेच म्हणावे लागेल, असेही अमृता फडवणीस यांनी सांगितले. आपले पती आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्णन त्यांनी ‘मिस्टर इंडिया’ असे केले. त्याचे स्पष्टीकरण देताना, ‘आमच्यासाठी ते मिस्टर इंडियाच आहेत. कारण ते घरात दिसतच नाहीत,’ असे सांगितले.

पती देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढवणारे आशिष देशमुख यांच्यावर अमृता फडणवीस यांनी टीका केली. देशमुख यांना पाहून ‘इधर चला मैं उधर चला… जाने कहा मैं किधर चला…’ या गाण्याची आठवण येते, असे त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -