घरमहाराष्ट्रकोकणात राज ठाकरे आणि नितेश राणे यांची भेट, २० मिनिटे चर्चा

कोकणात राज ठाकरे आणि नितेश राणे यांची भेट, २० मिनिटे चर्चा

Subscribe

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) आज कोकण दौऱ्यावर आहेत. कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी नितेश राणे यांच्यासोबत २० मिनिटे चर्चा केली. मात्र, या भेटीत कोणत्याविषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा – कोकणात अमित ठाकरे – नितेश राणे भेट, राजकीय चर्चांना उधाण

- Advertisement -

राज ठाकरे आज सावंतवाडीमध्ये आले होते. त्यावेळी नितेश राणे देखील सावंतवाडीमध्येच होते. त्यामुळे या दोघांची भेट लेमन ग्रास हॉटेल येथे झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत २० मिनिटे चर्चा झाली. भेटीनंतर नितेश राणे बाहेर आल्यानंतर त्यांना विचारले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. ही कौटुंबिक भेट होती. यावर मला आणखी काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात आधीपासूनच कौटुंबिक भेट आहे.

हेही वाचा -राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीचे राजकारण; राज ठाकरेंचा पुन्हा शरद पवारांवर आरोप

- Advertisement -

राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे जुलै महिन्यात कोकण दौऱ्यावर गेले होते. तेव्हाही त्यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांची भेट घेतली होती. नितेश राणे म्हणाले की, “राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमचे राजकारणाच्या पलिकडे संबंध आहेत. बाळासाहेबांचे सगळे गुण जसे राज ठाकरेंनी घेतलेत तसे राज ठाकरेंचे सर्व गुण अमित ठाकरेंनी घेतलेत, अगदी आवाजासकट.” असं नितेश राणे म्हणाले होते. तर, अमित ठाकरे यांनी अपलोड केलेल्या फोटोवर आम्ही भगवाधारी असं कॅप्शन दिलं होतं.

हेही वाचा – महिला मुख्यमंत्री : नव्या घोषणेतून उद्धव ठाकरे यांचा कोणावर निशाणा?

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -