Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज ठाकरे आज कोणत्या मुद्द्यावर बोलणार? संदीप देशपांडे म्हणाले, अतिशय खालच्या दर्जाचं...

राज ठाकरे आज कोणत्या मुद्द्यावर बोलणार? संदीप देशपांडे म्हणाले, अतिशय खालच्या दर्जाचं…

Subscribe

Raj Thackeray Melava | गेल्यावर्षी भोंग्याविरोधात आवाज छेडल्यानंतर यावर्षी राज ठाकरे कोणावर बाण सोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागेललं आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray Melava | मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त सकाळी शोभायात्रा निघाल्यानंतर सायंकाळी होणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतामधून लोकांचं प्रेम मिळत नसलं तरीही अशा सभांमधून मात्र तुफान प्रेम मिळतं. तसंच, पाडवानिमित्त राज ठाकरे जनतेला संबोधित करत असल्याने या दिवशी हमाखस राजकीय खाद्य मिळतं. ज्यामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळते. गेल्यावर्षी भोंग्याविरोधात आवाज छेडल्यानंतर यावर्षी राज ठाकरे कोणावर बाण सोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागेललं आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

“दरवर्षी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात एक नवीन संदेश घेऊन राज ठाकरे समोर येतात. सध्या जे गलिच्छ आणि अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चालू आहे, त्याच्यावर तुरटी फिरवण्याचं काम राज ठाकरेंचं आजचं भाषण करेल”, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

- Advertisement -

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये अभूतपूर्व सभा घेतली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याच गोळीबार मैदानातून ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. कोणाची सभा तुफान गाजली यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता राज ठाकरेंच्या सभेला किती गर्दी होणार यावर चर्चा रंगू लागली आहे. याबाबत संदीप देशपांडे म्हणाले की, “राज ठाकरेंचं भाषण म्हणजे अणुबॉम्ब असणार आहे आणि त्याचे हादरे सगळ्यांनाच बसणार आहेत. राज ठाकरेंची सभा ही नेहमीच रेकॉर्ड ब्रेक असते. त्यांच्या आधीच्या सभांचा रेकॉर्ड हे फक्त तेच मोडू शकतात. बाकी कुणालाही त्यांच्या सभेचा रेकॉर्ड मोडणं शक्य नाही.”

विशेष म्हणजे शिवाजी पार्क मैदान शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. येथे सभा अथवा मेळावे घेण्यास मनाई आहे. मात्र वर्षभरातील ३० दिवस या मैदानावर कार्यक्रम घेण्यास विशेष परवानगी दिली जाते. शिवसेना-भाजप युतीच्या काळात या दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्याचाही समावेश करण्यात आला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -