घरताज्या घडामोडीमनसेचा नेता ठेवणार प्रत्येक नेत्यावर नजर, शॅडो कॅबिनेटची स्थापना

मनसेचा नेता ठेवणार प्रत्येक नेत्यावर नजर, शॅडो कॅबिनेटची स्थापना

Subscribe

मनसेचे पहिले महाअधिवेशन होणार असून या महाअधिवेशनात मनसे शॅडो कॅबिनेटची स्थापना करणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. दरम्यान, आज मनसेचे पहिले महाअधिवेशन होणार असून या महाअधिवेशनात मनसे शॅडो कॅबिनेटची स्थापना करणार आहेत. तसेच आज दुपारच्या सत्रात याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती शिरीष सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. नितीन सरदेसाई या शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. विशेष म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात ‘शॅडो कॅबिनेट’ची स्थापना राबवण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर नरज ठेवण्यासाठी मनसेतून एकाएका नेत्याची नेमणूक केली जाणार आहे.

ही असणार आहे जबाबदारी

राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी पक्षातील प्रत्येक नेता आणि सरचिटणीस यांना संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा मनसे नेते पाठपुरावा करतील. हे सर्व नेते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड देणार आहेत. यामध्ये संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, शालिनी ठाकरे, जयप्रकाश बाविस्कर यासारख्या बड्या नेत्यांचा ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये समावेश असेल. मनसेच्या कोणत्या नेत्याकडे कोणत्या मंत्र्याची जबाबदारी असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisement -

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

सरकारमध्ये विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व दिले जाते. तसेच तो पक्ष सरकारच्या प्रत्येक नेत्याच्या हालचालींवर नजर ठेवतो आणि त्याच विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हटले जाते. कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे १५ ते २० मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र, ३३ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हे आहेत.


हेही वाचा – ‘शिवमुद्रा’ असलेल्या मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -