घरताज्या घडामोडीराज्याचा गृहमंत्रीच ED ला येडा समजतो, राज ठाकरेंनी उडवली देशमुखांची खिल्ली

राज्याचा गृहमंत्रीच ED ला येडा समजतो, राज ठाकरेंनी उडवली देशमुखांची खिल्ली

Subscribe

महाराष्ट्रात शरियत कायद्याची गरज, मगच सुधारतील

राज्यात महिलांविरोधात सुरू असलेल्या अत्याचाविरोधात भाजपने सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी लक्ष्य केले आहे. राज्यात घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही प्रश्न विचारण्यात आला. महिला अत्याचाराच्या घटनांवर राज ठाकरेंनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. राज्यात कोणालाच कोणत्या गोष्टीचा धाक उरलेला नाही. कारण कोणालाच कोणत्याच गोष्टीची भीती उरलेली नाही. त्यामुळेच राज्यात शरियतसारखा कायदा आणण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. शरियतसारख्या कायद्याशिवाय सुधारणार नाहीत. गृहमंत्र्यांच्या वागणुकीवरही राज ठाकरेंनी टीका केली आहे. (Raj Thackeray on Anil Deshmukh on abnsence before ED enquiry)

राज्यात कोणालाच कोणत्या गोष्टीची भीती उरलेली नाही. त्यामुळेच ही परिस्थिती राज्यात ओढावली आहे. या परिस्थितीतून जर सुधारायचे असेल शरियतसारख्या कायद्याची गरज आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्रीच जर ईडीच्या यंत्रणेला मानत नसतील तर आणि ईडी चौकशीला हजर राहत नसतील तर ते कदाचित ईडीला येडा समजत असावेत. राज्यात स्वतः गृहमंत्रीच जर सरकारी यंत्रणांनाच म्हणजे ईडीला दुय्यम, तिय्यम मानत असतील कुणाला कोणत्या गोष्टीची भीती उरलेली नाही हेच दिसून येते.

- Advertisement -

शरियत कायद्यातील कडक शिक्षा

शरियत कायद्यात कठोर शिक्षांची अंमलबजावणी करण्यात येते. त्यामध्ये भरचौकात फटके देणे, मृत्यूदंडाची शिक्षा देणे, अवयव छाटणे, दगडाने ठेचून मारणे यासारख्या शिक्षांचा समावेश आहे. शरियतमधील शिक्षांविरोधात अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. धार्मिक कट्टरतेच्या दृष्टीने तालिबानमध्ये या कायद्याचे अतिशय कठोरपणे पालन करण्यात येईल अशी अपेक्षा केली जात आहे.


हेही वाचा – प्रभाग पद्धत : सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीची थट्टा, राज ठाकरेंचा संताप

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -