घरमहाराष्ट्रमुंबई परप्रांतियांना देऊन टाकली का? - राज

मुंबई परप्रांतियांना देऊन टाकली का? – राज

Subscribe

मुंबई परप्रांतियांना देऊन टाकली का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये येणाऱ्या प्ररप्रांतियांचा मुद्दा पुन्हा मांडला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये राज बोलत होते.

परप्रांतियांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सवाल खडे केले आहेत. मुंबई परप्रांतियांना देऊन टाकली का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये येणाऱ्या प्ररप्रांतियांचा मुद्दा पुन्हा मांडला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी फक्त गुजराती मारवाडींच्या संस्था का उभ्या राहतात? मराठी माणसाच्या संस्था का उभ्या राहत नाहीत? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

राज्यात बाहेरच्या राज्यांमधून रोज ४८ रेल्वे येतात. रेल्वे येताना भरून येतात. पण, जाताना मात्र रिकाम्या जातात. या रेल्वेमधून जे लोंढे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये येतात ते गेले कुठे? यात गुन्हेगार कोण? पोटासाठी कोण आलंय? याचा शोध घेतला जातो का? असे एक ना अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. दरम्यान, केवळ पोलिसांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे. त्यामुळे पोलिसांचा आदर केलाच पाहिजे असे देखील यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी पोलीस किंवा कोर्टाकडून येणाऱ्या कागदांबद्दल मला केव्हाच काहीही समजलं नाही. मला पकडलं आहे की सोडलं आहे हे समजून घेण्यासाठी मला वकिलालच बोलवावं लागतं असं म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी परप्रांतियांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

वाचा – राज ठाकरे यांनी स्वीकारले उत्तर भारतीयांचे आमंत्रण

मुख्यबाब म्हणजे येत्या २ डिसेंबर रोजी राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर हजर राहणार आहेत. त्यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, त्या कार्यक्रमाच्या ८ दिवस अगोदर राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांच्या मुद्याला हात घातला आहें.

वाचा – राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी – निरूपम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -