Homeमहाराष्ट्रनाशिकRaj Thackeray on PM Modi: यावेळी पंतप्रधानपदी कोण? राज ठाकरेंनी खुमासदार शैलीत...

Raj Thackeray on PM Modi: यावेळी पंतप्रधानपदी कोण? राज ठाकरेंनी खुमासदार शैलीत दिलं उत्तर

Subscribe

नाशिक: राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस असून आज त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत मराठी माणसांच्या प्रश्नांवरील मुद्दे अधोरेखित केले. तसंच, त्यांनी पंतप्रधान कोण होणार यावरही भाष्य केलं आहे. (Raj Thackeray on PM Modi Who is the Prime Minister this time Raj Thackeray gave the answer in Khumasdar style)

राज ठाकरे म्हणाले की, निवडणुकीबाबत पुढे ठरवू काय करणार, अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्यात अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत, आम्हीही करत आहोत, असं राज ठाकरे म्हणाले.

यावेळी पंतप्रधान कोण?

2014 साली नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान व्हावा, असा प्रचार राज ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे यावेळी पंतप्रधानपदी कोणता नेता असावा? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिलं.

ते म्हणाले की, 2014 साली मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला नव्हता. त्यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधानपदावर असावी, अशी फक्त इच्छा व्यक्त केली होती. यावेळी अजून तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा? याची चाचपणी सुरू आहे. माझी चाचपणी झाली की सांगेन, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

लोकसभेचं काही सांगता येत नाही

राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. शाश्वत ठोकताळे देता येत नाहीत. आता यंदाच्या निवडणुकीत काय होईल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. 1995 सालच्या निवडणुका या बाबरी मशिदीचा ढाचा पाडणं, बॉम्बस्फोट या मुद्यावर झालेल्या लोकांनी त्या रागातून मतदान केलं होतं. काँग्रेसच्या मतदारांनी शिवसेना- भाजपा युतीला मतदान केलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा: Election 2024 : ठाकरे, पवारांची माघार; पूर्व विदर्भात काँग्रेस सर्वाधिक जागांवर लढणार? )