घरमहाराष्ट्रसत्ता द्या, सर्व टोल बंद करतो; टोलमुक्तीवरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर तुफान फटकेबाजी

सत्ता द्या, सर्व टोल बंद करतो; टोलमुक्तीवरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर तुफान फटकेबाजी

Subscribe

मुंबई – “महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन अर्धवट सोडते असा आरोप केला जातो. पण अर्धवट सोडलेलं एकतरी आंदोलन दाखवा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच, टोलमुक्तीसाठी मनसेने आंदोलन केलं. या आंदोलनामुळे ६५-६६ टोलनाके बंद झाले. पण हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारणार नाहीत. मात्र मनसेबाबत खोटा प्रचार करतील,” असा आरोपही राज ठाकरेंनी यांनी केला. त्यांनी आज मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात सभा घेतली. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी आज पहिल्यांदा सभा घेतली. पहिल्याच सभेत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर आसूड ओढले.

“शिवसेना-भाजपने जाहीरनाम्यात लिहिलं होतं की टोलमुक्त महाराष्ट्र करणार. पण त्यांना कोणीही प्रश्न विचारणार नाही. मात्र तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार. इतर टोलनाके आम्ही बंद केले, पण तुम्ही काय केलं. पुणे, मुंबई, ठाण्यातील टोल अजूनही चालू आहेत. सर्वठिकाणी टोल चालू आहेत. टोलवर पैसे गोळा करतात, रक्कम गोळा करतात. आपला पहिला प्रश्न असा होता की टोल किती वर्ष राहणार? किती पैसे गोळा होतात? हे पैसे जातात कुठे? कोणाकडे जातात? ही सर्व कॅश आहे. ही कॅश कोणाकडे जाते? त्याचं पुढे काय होतं? याची उत्तरे कोणत्याही सरकारने दिली नाहीत. ज्या ठिकाणचे टोल नाके बंद झाले, त्यांच्याकडून आशिर्वादच मिळाले. त्यामुळे द्या सत्ता हातात, बाकीचे टोलही बंद करून देतो,” असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलं आहे.

- Advertisement -

टोलवरून राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. “टोलवाल्यांकडून सत्ताधाऱ्यांना पैसे जातात. म्हणूनच यांना टोल बंद करायचे नाहीत. त्यामुळे ते विषयही काढत नाही,” असंही राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यंतरी भोंग्याविरोधातही आंदोलन छेडले होते. या आंदोलनाबाबतही राज ठाकरेंनी आजच्या भाषणात माहिती दिली.  आमच्या आंदोलनामुळे ९२-९३ टक्के भोंगे कमी झाले. कमी आवाजात प्रार्थना होतात, असं राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात असं कधीही घडलं नव्हतं

महाराष्ट्रात जे दोन अडीच वर्ष सुरू आहे ते महाराष्ट्रासाठी चांगंल नाही. असं आधी कधीच झालं नव्हतं. २०१९ ला मतदान केलं त्यांना कळलंही नसेल की त्यांनी कोणाला मतदान केलं. कोण कोणाला मिसळलं हे कोणालाच कळत नाय. हे राजकारण नाही. ही तात्पुरती सत्तेची अॅडजस्टमेंट आहे. मी बंड केल्याचंही मला मुलाखतीत विचारलं गेलं. पण माझं बंड लावू नका, हे सगळेजण गेले ते एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. मी बाळासाहेबांना भेटून, त्यांना सांगून बाहेर पडलो, असंही राज ठाकरे म्हणाले.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -