घरमहाराष्ट्रनागपूरउद्योगांसाठी पहिली चॉईस महाराष्ट्र, पण आपलं दुर्दैवं..., राज ठाकरेंचा वेदांताप्रकरणी सरकारवर निशाणा

उद्योगांसाठी पहिली चॉईस महाराष्ट्र, पण आपलं दुर्दैवं…, राज ठाकरेंचा वेदांताप्रकरणी सरकारवर निशाणा

Subscribe

नागपूर – भारतात जे उद्योग येऊ इच्छितात त्यांचा पहिला चॉईस महाराष्ट्र असतो. पण आपण ते उद्योग घालवतोय यापेक्षा दुर्दैव नाही, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्राकडे लक्ष नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. यावेळी त्यांनी विलासराव देशमुख यांच्या काळातील BMW प्रकल्पाचंही उदाहरण दिलं.

राज ठाकरे म्हणाले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमड्ब्युलचा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता. या प्रकल्पासाठी मंत्रालयात बैठक ठरली. पंरतु, काहीतरी कारणांनी विलासराव निघून गेले. तिथे उपस्थित असलेल्या मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी BMW प्रकल्पाचे इतर अधिकारीही उपस्थित होते. ते अधिकारी दाक्षिणात्य होते. उद्योग राज्यात येतो तेव्हा काही पायभूत सुविधा तिथे लागतात. मात्र, त्या सुविधांसाठीच मंत्रालयातील अधिकाऱ्यांना नानाचा पाढा लावला. जमिन हस्तांतरण जलद गतीने होणार नाही, विजेचा प्रश्न आहे. पाणी नाही, असे सर्व निगेटिव्ह रिमार्क द्यायला सुरुवात केली. बैठक संपली, तेव्हा लागलीच तामिळनाडूच्या लोकांना त्यांच्याशी संपर्क केला. म्हणून हा कारखाना तामिळनाडूमध्ये गेला.

- Advertisement -

येणाऱ्या उद्योगांसाठी पैसे मागणार असू तर कोण येईल, आणि का येईल. उद्योगांमुळे रोजगार निर्मिती होते. त्यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं चांगलं नाही. असं राज ठाकरे म्हणाले.

चौकशी व्हायला पाहिजे

- Advertisement -

महाराष्ट्राचं लक्ष नाहीय या सर्व गोष्टींकडे. ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे, तेवढं दिलं नाही जात. महाराष्ट्रात आधीच अनेक उद्योग आल्यामुळे आता उद्योग गेले तर काय फरक पडतो अशी आता राज्यकर्त्यांना वाटतं. हे फिस्कटलं कुठे याची चौकशी व्हायला पाहिजे. या उद्योगांसाठी पैसे मागितले का याची चौकशी व्हावी.

माझा धोरणांना विरोध, वैयक्तिक टीका नाही

माझा धोरणांना विरोध होता, धोरणांवर टीका होती,वैयक्तिक टिका नव्हती. सध्या वैयक्तिक टीका फार वाढली आहे. आघाडी करतानाही अनेक वाद होतात. राजकारणामध्ये मी मोदींच्या धोरणांवर टीका केली होती, असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे कालपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपुरातील सर्व प्रमुख पदं बरखास्त केली. काही चुकीच्या गोष्टी आढळल्याने पदं बरखास्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आता नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच, नागपूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो, विविध संघटनांशी चर्चा केली, विदर्भ दौऱ्यानंतर कोकण दौऱ्यावर जाणार असल्याचंही ते म्हणाले.

इकडे तिकडे फिरण्यापेक्षा महाराष्ट्रातील समस्यांवर लक्ष द्यावं, अशी टीका राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर का जातायत याकडे लक्ष द्यावं, असंही राज ठाकरे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -