मनसेने आंदोलन अर्धवट सोडल्याचं उदाहरण दाखवा, राज ठाकरेंचा अजितदादांवर पलटवार

Raj Thackeray question against Ajit Pawar Show the example of MNS leaving the movement halfway
मनसेने आंदोलन अर्धवट सोडल्याचं उदाहरण दाखवा, राज ठाकरेंचा अजितदादांवर पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन अर्धवट सोडली आहेत. अनेक भूमिका बदलल्या आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. आता राज ठाकरेंनी पुण्यातूनच थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी कोणती भूमिका अर्धवट सोडली याचे उदाहरण दाखवा असा सवालच राज ठाकरेंनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात ६४ ते ७० टोलनाके मनसेमुळं बंद झाले आहेत. यांची काही जबाबदारी आहे की नाही? असा पलटवार राज ठाकरेंनी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांना राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी अनेक भूमिका बदलल्या असल्याचे अजित पवार म्हणाले होते. यावर राज ठाकरेंनी आंदोलन अर्धवट सोडल्याचं एक उदाहरण दाखवा. असे म्हणत मनसेच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील ६४ ते ७० टोलनाके बंद झाले. यांची काहीच जबाबदारी नाही. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान मुंबईत बॉलिवडूमध्ये पाकिस्तानी कलावंत येत होते त्यांना देशातून हाकलून दिलं, त्यावेळी हिंदुत्वाची पक पक करणारे कुठं होते. रझा अकादमीच्या मोर्चावेळी आमच्या भगिनींवर हात टाकला होता. त्यावेळी मनसेनं मोर्चा काढला असे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात रेल्वे भरती होती, उत्तर भारतीय लोकं महाराष्ट्रात आली. त्या लोकांचा फोटो पाहून भेटून घ्या, आमचे लोक त्यांना भेटायला गेले होते. तिथं बोलायला आमचे लोक बोलयला गेले होते. तिथल्या एकानं आमच्या पदाधिकाऱ्याला आईवरुन शिवी दिली आणि प्रकरण सुरु झालं असे राज ठाकरेंनी सांगितले.

अजित पवार काय म्हणाले होते?

त्यांचे एकही आंदोलन यशस्वी होऊ शकले नाही. मागे त्यांनी टोलविरोधात आंदोलन केले. फक्त एक दिवस सगळे टोलजवळ जमले. त्याचे पुढे काय झाले? परप्रांतीयांविरोधात आंदोलन केले, टॅक्सीवाल्यांना मारले. परप्रांतीयांना महाराष्ट्रातून निघून जा म्हणाले, पण काय झाले? बिल्डरांना इमारतीची कामे करण्यासाठी माणसे मिळेनाशी झाली. पुन्हा त्यांना पकडून आणावे लागले. टोलमुळे रस्त्यांची कामे झाली, रस्ते सुधारले,आताही भोंग्यांवरून सुरू झालेल्या राजकारणाचा फटका मंदिरांनाही बसत आहे. रात्रीच्या वेळेस जागरण-गोंधळ, कीर्तनासाठी जमणार्‍यांना होत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.


हेही वाचा : …म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘कारण’