सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केलंय?, संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार.., राज ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासाबाबत भाष्य करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका खासगी वृत्त वाहिनीने ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा बकालपणा झाला आहे. जो चिखल झाला आहे, त्याचं काय? राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केलंय काही कळत नाही. मुंबईत खांबावर लाईट लावले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

शिक्षणाचे आणि वैद्यकीय परिस्थितीचे तेच झाले, सगळ्याचा विचका झाला आहे. त्या सगळ्या गोष्टींचा लोड हा शहरांवर येतो आणि शहरांवर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पैसे खर्च आता मेट्रो बांधले जातात आणि आपण बेसुमार फक्त खर्च करतो. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये, बाकीच्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असेल. कदाचित इतर शहरांमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये जाऊ शकत नाही असे रस्ते आहेत. आपण या गोष्टीचा विचार करत नाही आहोत. एखादी गाडी घेतली तर गाडी पार्क कुठे होणार आहे याचा विचार करत नाही. सरकार सरकारच्या पद्धतीने काम करतंय मग सरकारला काय वाटते हेच ठरत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

आमचं शाहरूख खान, सलमान खानसारखं नाही…

आमचं शाहरूख खान, सलमान खानसारखं नाही. त्यांचा एक चित्रपट पडला तर लगेच दुसरा सुरू करू शकतात. मात्र, आमचं असं नाही. आमचा एक चित्रपट संपला की लगेच सुरू करता येत नाही. आमचा पाच वर्षांनीच सुरू होतो. हे आमच्या हातात नसल्यामुळे पुन्हा ती पाच-पाच वर्षे जातात, असं राज ठाकरे म्हणाले.

अपेक्षित मतदान झालं नाही की…

अपेक्षित मतदान झालं नाही की मला राग येत नाही. मात्र वाईट या गोष्टीचं वाटतं की, एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही जर पदरात काही पडत नसेल तर वाईट वाटतं. कारण त्यामागे फार विचार असतो, मेहनत असते, असंही ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : “मी मुख्यमंत्री होण्यासाठी हे केलंच नाही!” अखेर एकनाथ शिंदेनी बंडखोरीमागची कहाणी उलगडली