घरमहाराष्ट्रRaj Thackeray : राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष उभा केला, मनसेने अजित पवारांना...

Raj Thackeray : राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष उभा केला, मनसेने अजित पवारांना सुनावले

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काल, मंगळवारी दिलेला निर्णय अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. याच निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर करत, मनसेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले आहे.

हेही वाचा – Anil Deshmukh On BJP : सर्वाधिक नाराज आमदार भाजपाचे; अनेक आमच्या संपर्कात – अनिल देशमुख

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला बहाल केले. विशेष म्हणजे, पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि सदस्यसंख्येनुसार निर्णय देण्याऐवजी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या प्रकरणाप्रमाणेच लोकप्रतिनिधींचे विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊनच अजित पवार यांच्या बाजूने हा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत सत्ताधाऱ्यांनी केले आहे. तर, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाने यावर जोरदार टीका केली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मी पक्षात राहणार नाही, हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी समजले होते. त्यांची जेव्हा मी शेवटची भेट घेतली तेव्हा त्यांनी मला थांबवले… मला मिठी मारली आणि सांगितलं की आता जा…, अशी आठवण राज ठाकरे सांगताना दिसतात.

हेही वाचा – Sanjay Raut : “भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा, हीच मोदी गॅरंटी…”, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

ते माझे बंड नव्हते; छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे हे सगळे जण एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. पण मी बाळासाहेबांना भेटून, सांगून बाहेर पडलो आहे. दगाफटका करून गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. बाहेर पडूनही दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेलो नाही तर, मनसे कार्यकर्त्यांच्या विश्वासावर स्वत:चा पक्ष उभा केला, असे राज ठाकरे सांगतात. मनसेने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना, ‘काका – पुतण्यांमधला ओलावा… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात’ असे सांगत अजित पवार यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा, हीच मोदी गॅरंटी…”, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -