घरताज्या घडामोडीमी प्रबोधनकार वाचलेत, त्यांचे संदर्भ त्या काळातले, राज ठाकरेंचं शरद पवार यांना...

मी प्रबोधनकार वाचलेत, त्यांचे संदर्भ त्या काळातले, राज ठाकरेंचं शरद पवार यांना प्रत्युत्तर

Subscribe

सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे वाचावे याचा अर्थच कळला नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले आहेत. मी जे बोललो ह्याचा प्रबोधनकार ठाकरे माझ्या आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजावून सांगावं, ४ दिवसांपुर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीचा विषय हा स्वातंत्र्याची ७४ वर्ष आणि ७५ व्या वर्षातील पदार्पण असा होता. या ७४ वर्षाच्या प्रवासात आपण काय गमावलं आणि काय गमावलं याचा उल्लेख या मुलाखतीत होता. यावेळी सांगितले की, आपल्या हातात मोबाईल आले, चांगले रस्ते, चांगल्या गोष्टी घडल्या याला आपण प्रगती माणणार आहोत की, आपण वैचारिक प्रगत होणार आहोत. जेव्हापर्यंत आपण वैचारिक प्रगत होणार नाही तोपर्यंत आपल्या हातात कितीही चांगली गोष्ट आली तर ती प्रगतीची लक्षण नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का अशा अंगाने आपण ७४ वर्षे मोजली पाहिजे अस मी म्हटलं आहे.

आपण अजूनही जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. जातीपातींच्या बाबत चर्चा करतो आहोत. निवडणूकीत सगळ्यांची भाषण होतात तेव्हा ७४ वर्षांपासून आपण तेच सांगतो की, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, वीज देऊ,पाणी देऊ जर आपण एवढी वर्ष हेच सांगणार आहोत तर आपण काय कमावलं आणि काय गमावलं हे आपल्याला शोधणं गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं रोखठोक उत्तर


शतकानुशतके जात आपल्या महाराष्ट्रासह देशात आहे. जगातही असू शकतील. पण साधारणपणे ९९ साल जर आपण पाहिले तर ९९ सालाच्या आधी जातीपाती होत्या परंतू त्यानंतर ९९ नंतर जातीपातीमध्ये एकमेकांच्या बद्दल द्वेष वाढला हे माझं वक्तव्य आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जाती जातींमध्ये जास्त निर्माण झाला. याच्या अगोदर प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान होता. जातीवर राजकारण होत होते. मात्र दुसऱ्या जातीबाबत द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर झाला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे फक्त बोललो फक्त मी, या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे वाचावे याचा अर्थच कळला नाही. प्रबोधनकार ठाकरे मी वाचलेत. त्यांची सगळी पुस्तके वाचली आहेत. त्यांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढं प्रबोधन ठाकरेंचं घ्यायचे आणि बाकीचं घ्यायचं नाही असं चालणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  प्रबोधनकारांचं लिखाण वाचण्याचा पवारांचा सल्ला, आता संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना पुस्तकं पाठवणार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -