घरताज्या घडामोडीमनसे अध्यक्ष राज ठाकरेंना परळी न्यायालयाचे समन्स; हजेरी लावणार का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना परळी न्यायालयाचे समन्स; हजेरी लावणार का?

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना परळीच्या (Parali) न्यायालयाने समन्स बजावले आहे. येत्या 12 जानेवारीला त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना परळीच्या (Parali) न्यायालयाने समन्स बजावले आहे. येत्या 12 जानेवारीला त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे परळी न्यायालयात हजेरी लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Raj Thackeray summonsed by Beed Parli court orders to be present on 12 January)

नेमके प्रकरण काय?

22 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरे यांना अटक झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळी गंगाखेड परिसरात निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात राज ठाकरेंना हे समन्स बजावण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट रद्द करून जमीन मिळवण्यासाठी राज ठाकरे परळीत 12 जानेवारी रोजी येण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील सदर प्रकरणात राज ठाकरे यांना दोन वेळा वॉरंट जारी करण्यात आले होते.

राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्ते पहिल्या तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरेंना 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत परळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेतील मनसेचे तत्कालीन पदाधिकारी संजय आघाव, अनीस बेग, शिवदास बिडगर, राम लटपटे, प्रल्हाद सुरवसे या पाच जणांनी न्यायालयात हजर होऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. मात्र राज ठाकरे यांच्याविरुद्ध 13 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा 12 जानेवारीचं समन्स राज ठाकरे यांना बजावण्यात आला आहे.


हेही वाचा – अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये; अजित पवारांवर संभाजीराजे संतापले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -