घरताज्या घडामोडी'समृद्धी' झाला, मग मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? राज ठाकरेंचा गडकरींना सवाल

‘समृद्धी’ झाला, मग मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? राज ठाकरेंचा गडकरींना सवाल

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवर माहिती दिली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून माहिती दिली. याबाबत राज ठाकरेंनी स्वत: माहिती दिली. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गासारखा ७०० किमी लांबीचा महामार्ग इतक्या कमी वेळात होऊ शकतो. मग मुंबई-गोवा महामार्ग १६ वर्ष होऊनही पूर्ण का झालेला नाही?, असा प्रश्नही त्यांना विचारल्याचे सांगितले. दरम्यान, या महामार्गाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आज गडकरींना त्यांनी फोन केला. (Raj Thackeray Talk on phone call with Nitin Gadkari for mumbai goa highway work)

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा माहामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबात नितीन गडकरींना फोन केल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, “मी नुकताच कोकण दौरा केला. मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती पाहिली. त्यानंतर नितीन गडकरींना फोन केला आणि माहिती दिली. जर समृद्धी महामार्गासारखा ७०० किमी लांबीचा महामार्ग इतक्या कमी वेळात होऊ शकतो. मग मुंबई-गोवा महामार्ग १६ वर्ष होऊनही पूर्ण का झालेला नाही? गडकरींनी याबद्दल सविस्तर माहिती मला दिली. दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले वगैरे इतर माहिती दिली. पण जनतेला या सबबी देता येत नाहीत. आता तुम्हीच वैयक्तिकरित्या यात लक्ष घालून काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल ते बघा असं गडकरींना सांगितलं आहे”, असे राज ठाकरे सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर “नितीन गडकरी यांनीही तातडीने यात लक्ष घालून येत्या आठवड्याभरात काय करता येईल ते बघतो आणि कळवतो असे आश्वासन दिले”, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील विविध भागांत दौरे करत आहेत. नुकताच ठाकरेंनी कोकण दौरा केला. पक्ष संघटनेसोबतच कोकणातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी राज ठाकरेंनी हा दौरा केला होता. यावेळी राज ठाकरेंनी कोकणातील समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन जनतेला दिले.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला पालघरमध्ये यश मिळाले असून, गुंदले ग्रामपंचायतीवर मनसेने बाजी मारली. सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये तीन जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झाले. याबाबत राज ठाकरेंनी प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की, “मनसेला आणखी यश मिळेल. चांगली गोष्ट आहे. निकाल अजून लागत आहेत आणि आम्हाला आणखी चांगलं यश मिळेल”, असे राज ठाकरेंनी म्हटले.


हेही वाचा – पाच महिन्यांपूर्वीच आपण मोठं ऑपरेशन केलं…, रुग्णालयांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -