घर ताज्या घडामोडी 'हे' सिल्व्हर ओकवर पाठवा, 'खुपते तिथे गुप्ते'मधून राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा

‘हे’ सिल्व्हर ओकवर पाठवा, ‘खुपते तिथे गुप्ते’मधून राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा

Subscribe

दिग्दर्शक आणि गायक अवधूत गुप्ते यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल १० वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला होता. आता ट्रेलरही समोर आलाय. या प्रोमोमध्ये राज ठाकरेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. तर आता ट्रेलरमध्ये त्यांनी थेट शरद पवारांनाच (Sharad Pawar) लक्ष केलं आहे.

या प्रोमोमध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार (ajit pawar) यांच्यावर निशाणा साधत त्यांची मिमिक्रीही केली आहे. तसेच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरुनही टोला लगावला आहे. या मुलाखतीत अवधुत गुप्ते यांनी एका बॉक्समधून काही गिफ्ट दाखवत राज ठाकरेंना प्रश्न विचारले आहेत.

- Advertisement -

पहिल्यांदा त्यांनी चश्मा हे गिफ्ट राज ठाकरेंना दिलं आणि हे कोणाला आवडेल, असा प्रश्न ठाकरेंना विचारला. त्यावर एक चश्मा पुरणार नाही. तुम्हाला मला अनेक चश्मे द्यावे लागतील. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला एक-एक गिफ्ट द्यावे लागेल, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या बॉक्समधून गाजर हे गिफ्ट काढलं. हे कोणाला द्यायला आवडेल, असा प्रश्न ठाकरेंना विचारला असता, त्यावर राज ठाकरे म्हणाले की, हे सिल्व्हर ओकवर पाठवा. सिल्व्हर ओकला आत्तातरी कोणी गाजर दाखवू शकत नाही, तेच सगळ्यांना गाजर दाखवतात. भाजपच्या कार्यालयातही पाठवलं तरी चालेल, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांना अजित पवारांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये अजित पवार, राज ठाकरेंविषयी भाष्य करत आहेत. एकदा पक्षामधून बाहेर पडल्यावर १४ आमदार निवडून आणले. पण, सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले, असं अजित पवार म्हणतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनीही त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -


हेही वाचा : शिंदेंचे आमदार संतोष बांगर लग्नात येताच ‘50 खोके-एकदम Ok’च्या घोषणा, Video व्हायरल


 

- Advertisment -