घरमहाराष्ट्रRaj Thackeray live : राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या 'या' दोन मागण्या

Raj Thackeray live : राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या ‘या’ दोन मागण्या

Subscribe

नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान देशाला मिळावा अशी मागणी मी पहिल्यांदा केली होती. आता पंतप्रधान मोदींना माझं सांगण आहे, या दोन मागण्या पूर्ण करा या देशावर खूप मोठे उपकार होतील. एक म्हणजे या देशात समान नागरी कायदा आणा. आणि दुसरं म्हणजे या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज ठाण्यातील आयोजित ‘उत्तर’ सभेत बोलत होते.

“आम्हाला आसुया नाही, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच- पाच… आम्हाला त्याचा नाही त्रास होत. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, त्याप्रकारे देश एकेदिवशी फुटेल, त्यामुळे हे आपल्या देशात होणे आवश्यक आहे. त्यामुळे मला ज्या गोष्टींचा विरोध करायचा होता तो मी केला, उद्या जर मला एखादी गोष्ट नाही पटली तर परत करेन. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

- Advertisement -

“पण विनाकारण भाषणाला उठले आणि उगाच विरोध करायचा नाही. आता तुम्ही चिखल खाल्ला, तुम्ही शेणं खाल्ला, आता तुमच्यावर बोलणार” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

“ज्यावेळी मी बोललो ती गोष्टी उघडपणे बोललो मला या भूमिका नाही पटल्या नाही… पटल्या म्हणजे नाही पटल्या… परंतु त्याच मोदी सरकारमध्ये ३७० कलम रद्द केले तेव्हा अभिनंदन करणारे पहिले ट्विट माझे होते. नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान देशाला मिळाला असे पहिले मी बोललो त्यानंतर दुसरे बोलले आहेत. ३० वर्षानंतर एका व्यक्तीच्या हातात पूर्ण बहुमत आल्यानतंर कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या, आजही माझी तिच मागणी आहे, बाकीच्या गोष्टी सोडा. असा राज ठाकरे म्हणाले आहेत.


माझ्या ताफ्याला अडवणार हे कळलं, पण पवारांच्या घरावरील हल्ल्याचं समजलं नाही : राज ठाकरे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -