राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात पुण्यात सभा, उद्या 12 वाजता करणार घोषणा

Doctors advise Raj Thackeray to rest

राज ठाकरेंनी एका पाठोपाठ एक सभा घेत राज्यात रान पेटवले आहे. त्यांनी हिंदुत्वाची भूमिका उचलून धर मशीदीवरील भोंग्यांविरोधात रणशिंग फुकले आहे. आता त्यांची सभा पुण्यात होणार आहे. पुढच्या आठवड्यात सभा घेणार आहेत. याबाबत घोषणा ते उद्या दुपारी 12 वाजता करणा असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या आठवड्यात पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. याबाबत माहिती मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागस्कर यांनी दिली. या सभेसंदर्भात बाकी माहिती राज ठाकरे उद्या जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यात चार ठिकाणी सभेसाठी परवानगी मागितली आहे. 2 जागेची परवानगी आमच्या हातात आहेत. उद्या सकाळी 12 वाजता राज ठाकरे पुण्यातील सभेची तारीख आणि ठिकाण जाहीर करणार, असल्याचे मनसे नेते बाबू वागस्कर म्हणाले.

राज ठाकरेंच्या सभेला गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक परवानगी अजून बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा पार पडनार आहे. त्यामुळे दौऱ्याला होणाऱ्या विरोधावर राज ठाकरे काय बोलणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ नये, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूण सिंह यांनी घेतली आहेत. मनसेकडून मात्र यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.