घरताज्या घडामोडी...त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पहिली हिंदुत्वाची हाक दिली, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

…त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पहिली हिंदुत्वाची हाक दिली, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

Subscribe

जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारण, आरक्षण,जातीचे राजकारण या सर्व विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्व देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात कसा आला याबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, जात आणि हिंदुत्व दोन वेगळ्या गोष्टी आहेत. १९८० ते १९८२ चा काळ पाहिला तर खासकरुन या गोष्टीला सुरुवात झाली तेव्हा शहाबुद्दीन नावाचे खासदार होते. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या आणि त्याच वेळी शाहबानो प्रकरण मोठं झालं होते. त्यावेळी मोठा मुस्लिम समुह रस्त्यावर आला, रस्तेच्या रस्ते ब्लॉक करणं, नमाज पडणं अशा अनेक गोष्टी सुरु झाल्या. १९८१ रोजीची भिवंडीची दंगल त्यामुळेच झाली होती. ती दंगल बांद्रा पर्यंत आली होती. शहाबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकसभेत बदलला होता. तो निर्णय बदलल्यामुळे शहाबुद्दीने बाबरी मस्जिदी संबंधांत काही गोष्टी सुरु केल्या.

हे प्रकरण दिवसेंदिवस मोठा होत चालला होता. त्यावेळी हिंदुत्त्वाचा विषय नव्हता. जेव्हा हे सगळं वाढायला लागले तेव्हा एका टप्प्यात आल्यावर देशातील हिंदूंना वाटले एकदा काहीतरी होऊन जाऊन दे… वातावरणात जर ती गोष्ट नसेल तर आणि तुम्ही जर ती गोष्ट सांगायला गेला तर लोकांना कळणार नाही. ती गोष्ट वातावरणात होती बोलत कोण नव्हते. ती गोष्ट पहिल्यांदा बोली गेली असेल तेव्हा साधारपणे १९८४ मध्ये इंदिरा गांधी गेल्या.. मग राजीव गांधी तेव्हा १९८५ असेल तेव्हाचा जो शहाबानोचा काळ असेल त्यावेळी वातावरणाला जर कोणी हिंदुत्वाची हाक दिली असेल बोलं असेल तर ते पहिले बाळासाहेब ठाकरे होते असे राज ठाकरे यांनी सांगितले आहं.

- Advertisement -

दरम्यान राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, त्यानंतर पहिली निवडणूक विलेपार्लेची निवडणूक झाली. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भाजप अध्यक्ष होते. त्यावेळी भाजपचा गांधीवादी समाजवाद होता. त्या निवडणूकीनंतर अटलजी गेले आणि अडवानीजी आले मग सगळं प्रकरण सुरु झाले. मग रथयात्रा, विटा, बाबरी मस्जिद मग राम मंदिर यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वातावरणात होती आणि नंतर ती मोठी झाली. प्रत्येकाच्या मनामध्ये होतं आणि हे बोललं पाहिजे. हा एक वेगळा मुद्दा आहे असे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हटलं आहे.

जातीचा मुद्दा हा नेत्यांच्या ओळखीचा भाग

जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. पाहिलं तर जातीचा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रात झाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर, कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे.

- Advertisement -

मग शिवाजी महाराजांचा इतिहास चुकिचा सांगितला गेला, शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर बोललं मग ते ह्या जातीच्या लोकांनी बोललंय, मग हे बोलले, प्रत्यक्षात काय? पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी साताऱ्यातील जाधव नावाच्या मुलानं फोनवर बोललं की, मोरोपंत पिंगळे या सर्वांनी शिवाजी महाराजांना विष दिलं आणि शिवाजी महाराज ओरडत होते त्यामुळे त्यांनी तोंडावर उशी दाबून ठेवली आणि मारलं.. तर त्या मुलाने विचारले हे संदर्भ तुम्ही कुठून आणलेत. हे कुठून कळलं? यामध्ये शेवट असा आहे की, खेडेकर म्हणाले मला जे वाटल ते मी लिहील मला वाटेल ते मी लिहीन असं त्यांनी म्हटलय.. हे वाचून अनेक मराठ्यांची डोकी भडकली परंतू यांनी असे लिहावं याच्यामागे डिजाईन होते. ज्या महाराष्ट्रानं या देशाला विचार दिला तो महाराष्ट्र जातीपातीमध्ये खितपत ठेवायचा का आपण?

जातीवरुन राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

आपल्याकडे महाराष्ट्रात जुनी पद्धत होती. आताही असेल ती म्हणजे तुमचं नाव काय तुम्ही नाव सांगता. मग म्हणतात कुणापैकी? कुणापैकी म्हणजे जात कोणती आहे तुमची? हे प्रकरण आता शाळेपर्यंत आलं आणि आता कॉलेजपर्यंत आलं आपण काय बोलतो आहोत. आपण महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करायचा आहे की, महाराष्ट्रात खितपत पडलेल्या या जातीच्या गोष्टींचा विचार करायचा आहे. काही जणांच्या स्वार्थासाठी या दऱ्या निर्माण करायच्या आणि राजकीय हीत मिळवून घ्यायचे.. हे आपण कुठे चाललो आहे. आपण युपी- बिहारच्या दिशेने चाललो आहे. जे करत आहेत ते क्षणिक आहेत त्याचा होणार परिणाम भयंकर आहे. आतापासून आपण जर समजून सांगितले नाही की हे तुमच्याशी खेळत आहेत. तुमच्यात काही इंटरेस्ट नाही आहे.

मराठा आरक्षण, झाला खेळ सारा, मी हे कधीपासून सांगतो आहे की, हे होणार नाही. मला आजही आठवतं आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार असताना मोर्चा निघाला होता. व्यासपीठावर भाजपचे लोकं होते शिवसेनेचे होते, राष्ट्रवादीचे होते अजूनही होते, सगळ्यांना मान्य आहे तर प्रॉब्लेम कोण करत आहे. आपल्याकडे देशात प्रश्न सुटणं हा प्रॉब्लेम समजतात, तो रेंगाळत राहणं यावर लोकांची घरं भरत असतात. हे जातीचे राजकारण संपत नाही. तोपर्यंत महाराष्ट्राची विकास होणार नाही असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -