घरमहाराष्ट्रपुणेराज यांचे श्वान प्रेम: वसंत मोरेंनी श्वानांसाठी उभारलेल्या केंद्राला दिली भेट

राज यांचे श्वान प्रेम: वसंत मोरेंनी श्वानांसाठी उभारलेल्या केंद्राला दिली भेट

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वान प्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरे हे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी खास करून श्वानांसाठी सुरू केलेल्या केंद्राला भेट दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक श्वान प्रेमी आहेत, हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी सुद्धा श्वान आहेत. पण राज ठाकरे यांचे श्वान प्रेम नव्याने समोर आले आहे. पुण्याचे मनसेचे नेते वसंत (तात्या) मोरे यांनी कात्रजमध्ये भटक्या श्वानांसाठी केंद्र उभारले आहे. आजपासून सुरू झालेल्या या केंद्राचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी या ठिकाणी हजेरी लावली.

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात आणि जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात भटक्या श्वानांमुळे मोठा त्रास होऊ लागला आहे. तसेच भटके श्वान ही या भागाची मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे या समस्येचे निराकरण करण्यासाठी वसंत मोरे यांनी या केंद्राची उभारणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पाच ते सहा लाख श्वान पुणे जिल्ह्यात असून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. यामुळे श्वानांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. युनिव्हर्सल संस्थेच्या माध्यमातून हे केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती वसंत मोरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली आहे. या केंद्रामध्ये श्वानांसाठी ओपीडी, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, स्वीमिंग पूल आणि इतर गोष्टींची देखील सोय करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वसंत मोरे हे पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली होती. राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेविषयी मोरेंनी उघडपणे नाराजी दर्शविली होती. ज्यामुळे ते लवकरच पक्षाला रामराम करतात का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता स्वतः राज ठाकरे हे वसंत मोरे यांनी उभारलेल्या श्वान केंद्राला भेट द्यायला आल्याने या चर्चांना ब्रेक लागला आहे.

मनसे नेते वसंत मोरे स्वतः एत श्वान प्रेमी आहेत. याआधी देखील त्यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्वानांना लसीकरण करण्याचे काम केले होते. ते नेहमीच सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असतात. ज्यामुळे त्यांच्या कामांची नेहमीच चर्चा करण्यात येत असते.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक.. लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न; मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -