“हा फोटो सर्वकाही सांगून जातो हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसलं नाही” शालिनी ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

शनिवारी वांद्रे कुर्ला संकुलन परिसरात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेत्या शालीनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपसून ठाकरे बंधू आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये वादा वादाची ठिणगी उडाल्याचे चित्र आहे. अशातच शनिवारी वांद्रे कुर्ला संकुलन परिसरात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेत्या शालीनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“हल्ली एक मुन्नाभाई भगवी शाल पांघरुन फिरतोय, त्याला आपणच बाळासाहेब आहोत, असं वाटू लागलंय”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शालिनी यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा जोडलेला एक फोटो ट्विट केला. या फोटोसोबत लिहीले की, “कधी बाळासाहेब दिसतात, तर भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो….फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही…!!!”, अशी टीका शालिनी यांनी केली आहे.

शालीनी ठाकरे यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला शिवसेना कशा शब्दांत प्रतित्युत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबईत शिवसेनेची भव्य सभा झाली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर जोरदार हल्लाबेल केला होता.

“काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं. तसंच सध्या एकजण भगवी शाल पांघरून फिरतोय. त्याला आपण आपणच बाळासाहेब आहोत, असं वाटू लागलंय. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तला कळतं की, आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे, तसंच यांचंही झालंय, त्यामुळे यांना फिरू द्या. कधी ते मराठीचा मुद्दा घेऊन फिरतील, कधी हिंदूंचा मुद्दा घेऊन येतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.


हेही वाचा – केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी; ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय