घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३'सत्तांध लोकांनी अटलजींचे विचार अंगी बाणवावेत', राज ठाकरेंनी टोचले भाजप नेत्यांचे कान

‘सत्तांध लोकांनी अटलजींचे विचार अंगी बाणवावेत’, राज ठाकरेंनी टोचले भाजप नेत्यांचे कान

Subscribe

भाजपच्या कर्नाटकातील पराभवानंतर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिवंगत भाजप नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ ट्विट करुन भाजपचे कान टोचण्यात आले आहे. या ट्विटमध्ये मनसेने म्हटले आहे, की सत्तांध लोकांनी अटलजींचे हे विचार अंगी बाणवावेत अन्यथा पराभव 'अटळ' आहे!

Karnataka Election Results 2023 मुंबई – भाजपच्या कर्नाटकातील पराभवानंतर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिवंगत भाजप नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ ट्विट करुन भाजपचे कान टोचण्यात आले आहे. या ट्विटमध्ये मनसेने म्हटले आहे, की सत्तांध लोकांनी अटलजींचे हे विचार अंगी बाणवावेत अन्यथा पराभव ‘अटळ’ आहे!

काय आहे व्हिडिओमध्ये
मनसेने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये अटलबिहारी सांगत आहेत की, ‘काही लोकांना काही काळासाठी वेडं (बेवकूफ) केलं जाऊ शकतं. काही लोकांना मोठ्या काळासाठी वेडं (बेवकूफ) केलं जाऊ शकतं. मात्र सर्वांनाच सदासर्वकाळ चिथावणी दिली जाऊ शकत नाही, वेडं ठरवलं जाऊ शकत नाही, भ्रमित करता येऊ शकत नाही. लोकांच्या सद्सदविविकेबुद्धीवरही विश्वास केला पाहिजे. याला थोडा वेळ लागतो. लोकशाहीचा मार्ग थोडा लांबचा आहे. लोकशाहीची चक्की थोडी हळू चालते, मात्र बारिक दळते.’

- Advertisement -

मनसेने या ट्विटमध्ये कोणाचेही नाव न घेता सत्तांध लोकांना उद्देशून हे ट्विट केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत नुकताच भाजपचा पराभव झाला आहे. या पराभवातून भाजपने धडा घ्यावा आणि लोकांना गृहित धरणे सोडून द्यावे असे राज यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. यावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अटलबिहारींचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

- Advertisement -

भाजपचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा पराभव  – राज ठाकरे 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावर भाष्य केले. भाजपने लोकांना गृहित धरले होते, ते लोकांनी नाकारले, असे ते म्हणाले होते.
‘विरोधीपक्ष कधी जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. भाजपचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा पराभव आहे. आपलं कोणी काही वाकडं करु शकत नाही, या स्वभावाचा हा पराभव आहे. जनतेला गृहित धरून केले जात असलेले राजकारण जनतेला आवडत नाही. जनतेला गृहित धरु नये हा बोध या निकालातून घ्यावा’, असे सांगत राज यांनी भाजपचे कान टोचले.

कर्नाटकातील विजयासाठी राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही कौतूक केले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम आहे. माध्यमांनी कितीही झाकून ठेवले तरी जनतेपर्यंत राहुल गांधी पोहचले आणि त्याचाच परिणाम कर्नाटकात काँग्रेसला मिळालेला विजय दिसत आहे.

हेही वाचा : जनतेला कधीही गृहीत धरू नये हे निकालातून स्पष्ट – राज ठाकरे

आमच्या पराभवाचे विश्लेषण दुसऱ्यांनी करु नये 
राज ठाकरेंनी भाजप नेत्यांना दिलेल्या सल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आमच्या पराभवाचे विश्लेषण दुसऱ्यांनी करु नये.’ यावर कल्याणमध्ये राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ‘आपण एखाद्या पराभवातून काय बोध घेतो, हा बोध घ्यायचाच नसेल तर वाघा तुम्ही तसंच. याचे अस्तित्व मोदींमुळे आहे, अन्यथा यांना कोण ओळखतं. ही सर्व छोटी माणसं आहेत’, अशा शब्दांत देवेद्र फडणवीसांना राज ठाकरेंनी टोला लगावला.

राज ठाकरे म्हणाले, “ज्यांची पोच नसते त्यांना गोष्टी कळत नाहीत. ही लोक कोण आहेत? ज्यावेळी सभा असतात, त्यावेळी नाक्यावर जाऊन सभा घेणारे काही असतात. काही गोष्टी अशा असतात की विरोधकांच्या जरी असल्या तरी, त्या मान्य कराव्या लागतात. ते मोठेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात, तर त्यांच्या पक्षातील खालच्या लोकांना कळले पाहिजे.” असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

हेही वाचा : ‘यांचे अस्तित्व मोदींमुळे, ही सर्व छोटी माणसं’, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -