घरताज्या घडामोडीतुमच्या भेटीची वाट पाहतोय, वाढदिवस साजरा करणं पटत नाही, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना...

तुमच्या भेटीची वाट पाहतोय, वाढदिवस साजरा करणं पटत नाही, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Subscribe

तुम्ही सर्वानी ह्या करोना काळात जागरूकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला फार अभिमान

राज्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील काही जिल्ह्यातही कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर आहे. यामुळे राजकीय नेत्यांनी आपले वाढदिवस साजरे न करता सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही येत्या १४ जूनला वाढदिवस आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे आपला वाढदिवस साजरा करु नये असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मलाही सर्व कार्यकर्त्यांना भेटायचे आहे. परंतु कोरोना संकटात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र जारी करत सर्वांना आवाहन केले आहे. राज यांनी पत्रात म्हटले आहे की, दरवर्षी माइया वाढदिवसाला आपण भैटतो. तुम्ही फार प्रेमानं अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे, तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माइया दृष्टीनं वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्यानं खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पहात असतो.

- Advertisement -

मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदाला यायला लागलं आहे. परंतु, परिस्थिती अजूनही गंभीर आहेच. आजचंच पहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल १२,२०७ नवे रूग्ण सापडले आणि १,६४,७४३ जण आत्ताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही है नक्की समजून घ्याल.

- Advertisement -

हे वातावरणच असं आहे की आपण सावध असल पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठया प्रमाणात गर्दी करणं, गाठी-भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की माइया भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच रहा. जिथे आहात तिथे सुरक्षित रहा. आपल्या कुटुंबियांची, आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमानं याल आणि आपली भेट होणार नाही असं नको व्हायला. तुम्ही सर्वानी ह्या करोना काळात जागरूकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला फार अभिमान आहे. अशाच कामात रहा. अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवानं आपल्याला सोडून गेले. तसंच कुणाचे रोजगार गेले, त्या सर्वाना धीर द्या. त्यांच्यासाठी आत्ता करता आहात तसंच काम करत रहा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा.

थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणांविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच. तोपर्यत जिथे आहात तिथेच पूर्ण काछ॒जी घेऊन कामात रहा. महाराष्ट्राला आत्ता आपल्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात रहा. त्याच मला माइया वाढदिवसाच्या शुभैच्छा म्हणून मी आनंदानं स्विकारीन.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -