Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगावं एकतरी केस त्यांच्या अंगावर आहे का?, राज ठाकरेंचा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगावं एकतरी केस त्यांच्या अंगावर आहे का?, राज ठाकरेंचा थेट सवाल

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठी माणसासाठी केलेल्या आंदोलनामुळे एकतरी केस तुमच्या अंगावर झाले का? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. तसेच अयोध्या दौरा मनसैनिकांवर गुन्हे दाखल होऊ नये तसेच मला सापळ्यात अडकवण्याचा कट असल्याचे समजल्यामुळे रद्द केला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेतून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी औरंगाबादच्या नामांतरवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे म्हणाले की, मी बोलतोय ना संभाजी नगरचं नामंतर झाले… अरे पण तु कोण आहे? तु वल्लभ भाई पटेल, महात्मा गांधी तु कोण आहे? अशा शब्दात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. तसेच इतक्या वर्षी केंद्रात सत्ता होती मग तुम्ही संभाजीनगर असं नामांतर का केले नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

अंगावर एक तरी केस आहे का? उद्धव ठाकरेंनी सांगावं – राज 

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल केला आहे. उद्धव ठाकरेंनी एकच सांगावं, एकतरी केस आहे का ओ तुमच्या अंगावर आहे का? कोणतीच भूमिका घ्यायची नाही. मराठा नाहीतर मराठी समाजासाठी केलेल्या आंदोलनामुळे एकतरी केस तुमच्यावर आहे का? असे राज ठाकरे म्हणाले आहेत. १९९२ -९३ ला दंगल झाली आणि त्यावरुन संभाषण सुरु करायचे असा टोलासुद्धा राज ठाकरेंनी लगावला आहे.

यांच्या राजकारणामुळे एमआयएम मोठा झाला – राज ठाकरे 

दरम्यान, यांच्या राजकारणासाठी म्हणून एमआयएमला मोठा केला. ते सतत बोलत राहिले पाहिजे ज्याच्यातून यांची रोजीरोटी सुरु राहील. यांच्या लक्षात नाही आले आपण एक राक्षस वाढवत आहे. म्हणता म्हणता एमआयएमचा खासदार झाला. या सगळ्या निजामाच्या औलादी महाराष्ट्रात आल्या असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

- Advertisement -

एमआयएमला जमीन दिली कोणी यांनीच करुन दिली आहे. यांचा तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. आमच्याच देशात महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो शिवछत्रपतींना मारण्यासाठी आला त्याच्यात कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज नाही कारण सत्तेसाठी बसले आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर केली आहे.


हेही वाचा : …म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘कारण’

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -