घरमहाराष्ट्रराहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्यावरून मनसे आक्रमक, शेगावात जमून...; राज ठाकरेंचे आदेश

राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्यावरून मनसे आक्रमक, शेगावात जमून…; राज ठाकरेंचे आदेश

Subscribe

मुंबई – भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांनी सावरकरविरोधी वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील विविध पक्षांकडून त्यांचा निषेध केला जातोय. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिले आहेत. शेगावात उद्या राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वक्तव्य केलं आहे. ब्रिटिशांकडून सावरकर पेन्शन घेत होते, असा दावा राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या भाषणात केला. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात गदारोळ झाला आहे. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनीही राहुल गांधींना इशारा दिला. तसंच, रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, आता राज ठाकरे यांनीही राहुल गांधींना विरोध केला आहे.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी उद्या शेगावात दाखल होणार आहेत. त्यामुळे मनसैनिकांनीही उद्या मोठ्या संख्येने शेगावात दाखल होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. उद्या शेगावात जाऊन राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवा असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

- Advertisement -

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच, स्वातंत्र्यवीरांनी जे स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याग केला होता, तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरता आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?

ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर बिरसा मुंडा झुकले नाहीत. ते आपल्या तत्वांवर ठाम होते. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श सावरकर आहेत. ते दोन-तीन वर्ष अंदमानच्या कारागृहात होते. तिथे त्यांनी दया अर्ज लिहिण्यास सुरुवात केली. सावरकरांनी स्वत:वर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते, ते त्यात सांगितले. त्यांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. त्यांनी ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात काम केले, असे राहुल गांधी म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -