घरठाणेराज ठाकरेंचा संघटनात्मक दौरा संपला; मुंबईतील बैठकीकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष

राज ठाकरेंचा संघटनात्मक दौरा संपला; मुंबईतील बैठकीकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून सभांचा धडाका लावला आहे. राज्यातील अनेक भागातील पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून सभांचा धडाका लावला आहे. राज्यातील अनेक भागातील पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करत आहेत. तसेच स्थानिक कार्यकारिणीत देखील ते पक्षाच्या दृष्टीने मोठे बदल करताना दिसून येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ते ठाणे आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्षासाठी महत्त्वाचे असे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या संघटनात्मक दौऱ्याची आज सांगता झालेली आहे. पण येत्या 17 तारखेला मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. (Raj Thackeray’s organizational tour ends; attention of office bearers towards meeting in Mumbai)

हेही वाचा – राज ठाकरेंच्या तडकाफडकी निर्णयाने बदलापूर, उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांना धक्का

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे जिल्ह्याचा संघटनात्मक दौरा तीन दिवसांपासून सुरू होता. याचा समारोप नवी मुंबई वाशी येथे करण्यात आला. आज डोंबिवली येथून ते वाशी येथे दाखल झाल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि चर्चा केली. वाशी येथे मनसे कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी संघटनात्मक माहितीसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात त्यांनी बेलापूर आणि ऐरोली विधानसभेतील कार्याचा आढावा घेतला.

तसेच, जनतेशी संपर्क ठेवत नसलेल्या पदाधिकाऱ्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर 17 तारखेला नवी मुंबई शहरातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी ते पुन्हा चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आज वाशी येथे त्यांनी सुमारे दीड तास कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत अनिल शिदोरे , अविनाश जाधव, आमदार राजू पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

या दौऱ्याच्या निमित्ताने भूमिपुत्रांनी त्यांच्या समस्या राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. शहरातील पर्यावरण नागरी काम, प्रशासकीय कारभार यावर नागरिकांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. मात्र पत्रकारांशी आता काय बोलणार असे स्पष्ट करत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. या दौऱ्याच्या वेळी त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याने येत्या 17 तारखेला मुंबई येथील बैठकीत ते स्थानिक पदाधिकाऱ्यांच्याबाबत काय भूमिका घेतात याकडे नवी मुंबई शहरातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज सोमवारी (ता. 15 मे) वाशी येथे या दौऱ्याचा समारोप करण्यात आला.

रविवारी बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकारिणी केली बरखास्त
राज ठाकरे यांनी त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये रविवारी (ता. 14 मे) दोन शहराच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पक्षातील अंतर्गत वाद पाहता पक्षात आणखी असंतोष निर्माण होऊ नये, याकरिता बदलापूर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अगदी सारखी परिस्थिती ही उल्हासनगर कार्यकारिणीची असल्याने ती देखील कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -