घरमहाराष्ट्रमशिदीवरील भोंगे एक महिन्यात हटवा, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

मशिदीवरील भोंगे एक महिन्यात हटवा, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

Subscribe

मशिदीवरील भोंगे बंद झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महिन्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला आहे. महिमच्या समुद्रात उभ्या राहात असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्याचीही मागणी राज ठाकरेंनी केली

मुंबई – मशिदीवरील भोंगे बंद झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महिन्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला आहे. शिवाजीपार्कात आयोजित पाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांचा विषय छेडाला आहे. त्यासोबतच महिमच्या समुद्रात उभ्या राहात असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्याचीही मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, ‘मागील वर्षी मशिदीवरील भोंग्यांचे आंदोलन झाले. तेव्हा काही काळ भोंगे उतरले पण आता ते पुन्हा वाजू लागले आहेत. एक तर ते तुम्ही बंद करा, किंवा मग आम्ही करतो. मग त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा.’ असा इशारा राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचाही दाखला दिला होता. ज्या मशिदीवर भोंगे लावले जातील त्यासमोर हनुमान चालिसा वाजवण्याचे आवाहन राज यांनी मागील वर्षी केले होते. त्यानंतर झालेल्या आंदोलनात राज्यभरात १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मागे घेण्याचे आवाहनही राज यांनी एकनाथ शिंदेंना केले आहे.

- Advertisement -

महिम समुद्रात उभारल्या जाणाऱ्या दर्ग्याबद्दल मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना इशारा
माहिमच्या समुद्रात दुसरं हाजी अली उभारलं जात असल्याचा मुद्दाही राज यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘माहिम समुद्रात मकदुम बाबा दर्गा उभारला जात आहे. त्याकडे माहिम पोलिसांचे लक्ष नाही, की महापालिकेचेही लक्ष नाही.’ हे नवीन हाजी आली तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज यांनी यावेळी केला. राज ठाकरे म्हणाले, ‘महापालिका प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त यांना आजच सांगतो की महिन्याभरात कारवाई करुन तो दर्गा हटवला गेला पाहिजे. अन्यथा त्याच्याच बाजूला मोठं गणपती मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय राहाणार नाही. मग काय व्हायचं ते होऊ देत.’ असा इशाराही राज यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘मी उद्धवला म्हटलं चल माझ्यासोबत….’ राज ठाकरेंनी सांगितला २००३ चा प्रसंग

राज यांच्या सभेत लावलेल्या मोठ्या स्क्रिन्सवर त्यांनी माहिम समुद्रातील ड्रोन व्हिज्यूअल्स दाखवले. त्यात कशा प्रकारे समुद्रात दर्गा उभारला जात असल्याचे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवले. प्रशासनाचं लक्ष नसलं की कसं होतं, ते बघा, असं म्हणत त्यांनी मुस्लिमांनाही हे पटतं का? असा सवाल केला.

हेही वाचा : मुंबई आहे की डान्स बार, तेच कळत नाही; सुशोभीकरणावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -