Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज ठाकरे नाशिकच्या मनसे पदाधिकार्‍यांशी ’थेट कनेक्ट’

राज ठाकरे नाशिकच्या मनसे पदाधिकार्‍यांशी ’थेट कनेक्ट’

आपला मोबाईल नंबर देत थेट संपर्क साधण्याचे ठाकरेंचे आवाहन

Related Story

- Advertisement -

पक्षाशी संबधित काहीही काम असेल तर यापुढे थेट माझ्याशी संपर्क साधा, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विभाग अध्यक्षांना थेट वैयक्तिक मोबाईल नंबर दिला. मुंबईत कृष्णकुंजवर झालेल्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी व विभाग अध्यक्षांबरोबर स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली.

आगामी महापालिका निवडणुका आणि पक्षबांधणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांसह सहाही विभाग अध्यक्षांसोबत चर्चा करत राज ठाकरेंनी आढावा घेतला. यावेळी विभाग अध्यक्षांना राज ठाकरे यांनी थेट व्यक्तिगत मोबाईल नंबर दिला व यापुढे थेट संपर्क करण्याच्या सूचना दिल्या.

- Advertisement -

या बैठकीला युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, अविनाश जाधव व योगेश परूळेकर उपस्थित होते. तर नाशिकमधून मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, रामदास दातीर, नितीन साळवे, विक्रम कदम व योगेश लभडे आदी उपस्थित होते.

२१ सप्टेंबरपासून नाशिक मुक्काम

राज ठाकरे २१ सप्टेंबरपासून नाशिक दौर्‍यावर येत असून, पक्ष विस्तार आणि महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. २२ तारखेला शाखा अध्यक्षांच्या नेमणुका होतील. २३ तारखेला सर्व सहाही विभाग अध्यक्ष व शाखा अध्यक्षांचा एकत्रित मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -