Homeमहाराष्ट्रकोकणRajan Salvi : पदाधिकारी म्हणाले - तुमच्यावर अन्याय झाला, तर राजन साळवींनी...

Rajan Salvi : पदाधिकारी म्हणाले – तुमच्यावर अन्याय झाला, तर राजन साळवींनी दिले पक्ष बदलाचे संकेत

Subscribe

मी नाराज असल्याच्या किंवा अशा तऱ्हेच्या बातम्या या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार आहे, असे विधान माजी आमदार राजन साळवी यांनी केले होते. पण आता त्यांनीच मोठे विधान करत पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत.

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला येत्या काही दिवसांमध्ये कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे. ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते राजन साळवी हे भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर जाऊ शकतात, अशी माहिती या चर्चांच्या माध्यमातून समोर आली. पण गुरुवारी (ता. 02 जानेवारी) स्वतः राजन साळवी यांनी अशा तऱ्हेच्या बातम्या या अफवा आहेत, असे म्हटले. पण त्यांच्या या विधानावर आता त्यांनी स्वतःच यू-टर्न घेतला असून पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनेवर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. (Rajan Salvi leader of Thackeray Group gave the indication of party change)

मी नाराज असल्याच्या किंवा अशा तऱ्हेच्या बातम्या या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार आहे. त्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही, मला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून समजत आहे की, मी नाराज आहे. मी भाजपाच्या, शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काहीही नाही, असे गुरुवारी राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांच्याकडून सांगण्यात आले. पण आज शुक्रवारी (ता. 03 जानेवारी) त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ज्यानंतर 24 तासांनंतर ते स्वतःच स्वतःच्या विधानावर ठाम नसल्याचे पाहायला मिळाले. कारण भविष्यात योग्यवेळी योग्य निर्णय घेईन, असे विधान माजी आमदार राजन साळवी यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाला खरंच धक्का बसणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा… Rajan Salvi : मी नाराज नाही, पण भविष्यात…; ठाकरे गटाला रामराम करण्याबाबत काय म्हणाले साळवी?

शुक्रवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर माजी आमदार राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साळवी म्हणाले की, राजापूर या ठिकाणी मी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत माझ्यावर अन्याय झालेला आहे, असे म्हटले. माझ्या पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहे. त्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, असे त्यांच्याकडून मत व्यक्त करण्यात येत आहे. ज्याला उद्देशून मी म्हटले की, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन. त्यांनी त्यांच्या आणि मी माझ्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत, असे म्हणत माजी आमदार राजन साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राजन साळवी नेमका काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.