घरमहाराष्ट्रRajan Salvi : राजन साळवी यांची स्वत:साठी नाहीतर कुटुंबीयांसाठी उच्च न्यायालयात धाव;...

Rajan Salvi : राजन साळवी यांची स्वत:साठी नाहीतर कुटुंबीयांसाठी उच्च न्यायालयात धाव; ‘हे’ आहे कारण

Subscribe

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी एक असलेले राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील घरावर काही दिवसांपूर्वी एसीबीने छापेमारी करत चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुबीयांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर राजन साळवी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता राजन साळवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात कुटुंबियांच्या अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. (Rajan Salvi appeal to the High Court for himself or his family)

हेही वाचा – Thackeray group : …पंतप्रधानाने देशासाठी काहीच केलेले नाही, ठाकरे गटाचा घणाघात

- Advertisement -

एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामिनावर याआधी 8 फेब्रुवारी रोजी होणार होती, मात्र सरकारी वकील उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयात दुपारी बारानंतर अटकपूर्वक जामिनावर निर्णय होणार आहे. त्यामुळे राजन साळवी यांनी त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र ते स्वत:साठी अटकपूर्व जामीन न घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन मिळणार का? हे पाहावे लागले.

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राजन साळवी हे आतापर्यंत रायगड एसीबीसह रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात सात वेळा हजर राहिले आहे. त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती देखील सादर केली आहे. तसेच बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राजन साळवी यांचा भाऊ, पुतण्या, पत्नी, मुलगा आणि स्वीय सहाय्यकांची चौकशी झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांची दाढी दिल्लीच्या हातात, राऊतांचा शिंदेंसोबत भाजपावरही निशाणा

काय आहे प्रकरण?

आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने रत्नागिरी एसीबीकडून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजन साळवी यांनी अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, राजन साळवी यांनी 3 कोटी 53 लाखांची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसीबीने केला आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख इतकी आहे. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच 14 वर्षात अपसंपदा जमा केल्याचा आरोपही राजन साळवींवर लावण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -