जयपूर : राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चालणारी सरकार निवडून येणार आहे, अशा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस तीन दिवसीय राजस्थान दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा 12 ते 14 सप्टेंबरपर्यंत आहेत. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस पदयात्रा आणि जाहीर सभा घेऊन लोकांना संबोधित करणार आहेत.
राजस्थानच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजस्थानमध्ये बदल निश्चित होणार आहे. राज्यस्थानमध्ये सुरू असलेल्या परिवर्तन यात्रेला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. यामुळे राजस्थानमध्ये परिवर्तन होईल. ज्याप्रमाणे काँग्रेस आणि अशोक गहलोत यांचे पोकळी आश्सासने लोकांच्या लक्षात येऊ लागली आहेत. यामुळे मला पूर्णविश्वास आहे की, राजस्थानमध्ये परिवर्तन होईल आणि मोदीसोबत चालणारे सरकार भाजपमध्ये येणार आहे.”
हेही वाचा – आरक्षण मिळणारच, पण आता उपोषण थांबवा…; भिडे गुरुजींची जरांगे पाटलांना विनंती
भाजपची परिवर्तन यात्रा
राजस्थानमध्ये भाजपकडून चार वेगवेगळ्या परिवर्तन यात्रा काढल्या जात आहेत. जोधपूरमध्ये 4 सप्टेंबर रोजी रामदेवरा येथून परिवर्तन यात्रा निघाली. यानंतर परिवर्तन यात्रेचा प्रवास हा जैसलमेर, बारमेर, जालोर, सिरोही मार्गे पाली येथे पोहोचला आहे. ही यात्रा 18 दिवसांच्या 51 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या प्रवासाचा समारोप जोधपूर शहरात होणार आहे.