घरठाणेराजेंद्र चौधरी यांचा समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश

राजेंद्र चौधरी यांचा समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Subscribe

उल्हासनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शुक्रवारी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला. चौधरी यांच्या सोबत युवासेना आणि महिला आघाडी यांचाही समावेश असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या येथील गटाला धक्का बसला आहे.

माजी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना जिल्हा अधिकारी धीरज ठाकूर, युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, उपशहरप्रमुख संदीप गायकवाड, विभागप्रमुख सुरेश सोनवणे, उत्तरभारतीय शहर संघटक के.डी.तिवारी, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रकाश सावकारे, माजी नगरसेवक सुमित सोनकांबळे, नरेंद्र दवणे, विजय सुपाळे, दत्तात्रय पवार, माजी नगरसेविका राजश्री चौधरी, सुरेखा आव्हाड, मंदा सोनकांबळे, महिला आघाडी उपशहर संघटक मनिषा राजपूत, शशिकला राजपूत, विभागप्रमुख, केसर मोरे, उपविभाग प्रमुख विल्सन डिसोजा, आदेश पाटील, संजय मरसाळे, बाजीराव लहाने, महेंद्र पाटील, बाळा गवारे, युवासेना उपशहर अधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे, जावेद शेख, पप्पू जाधव, समीर शेख, युवासेना सहसचिव रवी निकम, विभाग अधिकारी बबलू पाटील, हरी पवार, शेखर सपकाळे यांचा समावेश आहे.

- Advertisement -

राजेंद्र चौधरी यांनी शिवसेना शहरप्रमुख पदाचा सर्वाधिक कालावधी हाताळला आहे. अनेक माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत जात असताना राजेंद्र चौधरी हे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समनव्यक धनंजय बोडारे आदींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी एकजुटीने काम करत होते. यात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा टर्निंग पॉईंट ठरला असून या प्रकरणी चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रथम दोनदा सदिच्छा भेट घेतली आणि युवासेना, महिला आघाडीच्या टीम सोबत राजेंद्र चौधरी हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -