घरमहाराष्ट्रराज्याला रेमडेसिवीरची गरज; केंद्राकडून १ लाख ७० हजार वाईल्स कमी आले -...

राज्याला रेमडेसिवीरची गरज; केंद्राकडून १ लाख ७० हजार वाईल्स कमी आले – राजेंद्र शिंगणे

Subscribe

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. राज्याला रेमडेसिवीरची अधिक गरज असून केंद्राने ठरवलेल्या कोट्यापैकी १ लाख ७० हजार वाईल्स महाराष्ट्राला कमी आल्याचं अन्न व औषध प्रशासन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे. याशिवाय, राज्यात लसींचा तुटवडा आडही जाणवत असल्याचं शिंगणे यांनी म्हटलं. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यात रेमडेसिवीरची आवश्यकता लागणार आहे. केंद्राने जो कोटा ठरवून दिला होता, त्या कोट्यापैकी १ लाख ७० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कमी आले आहेत. केंद्राने दररोज साडे सहा लाख रेमडेसिवीर पुरवल्या पाहिजेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे केंद्राने तुटवडा निर्माण करु नये, असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं. राज्याला रेमडेसिवीर मिळण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करत आहेत, असं देखील शिंगणे यांनी सांगितलं.

- Advertisement -

राज्यात आजही लसीचा तुटवडा असल्याचं शिंगणे यांनी सांगितलं. केंद्राकडे लसीची मागणी केली आहे, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

महाराष्ट्रात १ मेपासून लसीकरण

लसींचे डोस अपुरे असल्यामुळे आणि नव्या डोसचा पुरवठा देखील पुरेसा नसल्यामुळे १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. मात्र, आज बोलताना राजेश टोपे यांनी १ मे पासून म्हणजेच शनिवारपासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातले सूतोवाच केले आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -