कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; केंद्राच्या पत्राद्वारे राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

coronavirus cases in india mumbai reports 852 new covid cases seven fatalities maharashtra

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशभरात गेल्या 24 तासात 11 हजार 793 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 34 लाख 18 हजार 839 झाली आहे. (rajesh bhusan union health secretary letter to states for corona infection focus)

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पाच कलमी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगितल्याचे समजते. या कलमांतर्गेत राज्यांनी कोरोना चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरण या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

दरम्यान, आगामी काळात आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये सण आणि उत्सव साजरे केले जातात. या सणांसाठी गर्दी होते. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच कलमी कार्यक्रमांतर्गत कोरोनाविरूद्ध लढणे आवश्यक आहे असल्याचा सूचना देण्यात आल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.

कोरोनाच्या रुग्णांच्या (Coronavirus Patients) संख्येत मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. अशातच आज राज्यात 3 हजार 482 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण (Coronavirus) हे मुंबईत आढळले आहेत. त्यानुसार, मुंबईत आज 1 हजार 210 रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज कोरोनातून (Covid 19) बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा जास्त आहे. त्यानुसार, आज दिवसभरात एकूण 3 हजार 566 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


हेही वाचा – राज्यात 3482 नव्या कोरोना रुग्णांची भर; मुंबईत 1210 रुग्ण बाधित