Mission Kavach Kundal : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’

health minister said Reserve space for postgraduate medical officers

महाराष्ट्राने आतापर्यंत कोरोनाविरोधी लसीकरणात १५ लाखांचा दिवसापोटीचा उच्चांक केला आहे. यापुढच्या काळातही महाराष्ट्राने आपलाच उच्चांक मोडला हवा. आगामी काळात २५ लाख क्षमतेने कोरोनाविरोधी लसीकरण व्हायला हवे. त्यासाठीच मिशन मोडवर असे मिशन कवच कुंडल राज्यात ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मिशन अंतर्गत दिवसापोटी १५ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येणार आहे. राज्याकडे सध्या १ कोटी डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात तिसऱ्या लाटेची भीती कमी करण्यासाठीच ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ९ कोटी १५ लाख लोकसंख्येपैकी ६ कोटी लोकांचा पहिला डोस झाला आहे. त्यामुळेच उर्वरीत ३ कोटी लोकांचे डोस प्राधान्याने देणे हे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. या ३ कोटी लोकांचे लसीकरण करून अॅंटीबॉडी आणि इम्युनिटी वाढवणे हेच उदिष्ट असल्याचेही ते म्हणाले. तिसऱ्या लाटेची दाहकता कमी करण्यसाठीच हे लसीकरण प्राधान्याने करण्यात येईल असेही टोपे म्हणाले (Rajesh tope announced mission kavach kundal to curb covid-19 third wave in maharashtra)

सीईओ, जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणांच्या मदतीने मिशनसाठी प्लॅन आखण्यात आला आहे. त्यासाठीच मायक्रो प्लॅनिंगही झाले असल्याचे सांगितले. त्यासाठी राज्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागाची बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गतचा कार्यक्रम सांगितला असल्याचेही ते म्हणाले. तलाठी, ग्रामविकास सगळ्यांच्या सहकार्याने केंद्रबिंदू मायक्रोप्लॅनिंग करण्यात आले आहे. सर्व साधन सामुग्री एएनएम, जीएनएम यांच्या मदतीने सिरिंजेस सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहे. आता फक्त लोकांना प्रबोधन करून केंद्रावर आणण्याची गरज आहे, त्या माध्यमातून हे काम करून घ्यायचे आहे. सगळ्यांनी उत्साहाने करू असेही सांगितले आहे. संपुर्ण महत्व लक्षात घेऊन कशा स्वरूपाने यश मिळवायचे हेदेखील स्पष्ट केल्याचे टोपे यांनी सांगितले.

आजपर्यंतच्या लसीकरणाची टक्केवारी

महाराष्ट्रात सध्या ९ कोटी १५ लाख लोकांचे लसीकरणाचे उदिष्ट आहे. पहिला डोस ६ कोटी लोकांनी घेतला आहे. आणखी ३ कोटी नागरिकांचे लसीकरणाचे उदिष्ट आहे. राज्यात १८ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी कोरोनाची लस दिली गेली, तर त्यांनाही एंटीबॉडिज संरक्षण मिळू शकेल. सेकंड डोस हे अडीच कोटी इतक्या प्रमाणात देण्यात आले आहेत. पहिल्या डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ६५ टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३० टक्के आहे. पण अजुनही सव्वा तीन कोटी लोकांना डोस द्यायचा आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठीची भीती कमी होण्यासाठी मदत होईल. राज्यात ६५ टक्के डोस झाल्याने निर्बंध हे आता १०० टक्के हटविण्यात आले आहेत. काही स्वरूपातील लोकांना कोरोनाचे संसर्ग आढळला तरीही लसीकरणामुळे याची दाहकता कमी असेल. परिणामी आयसीयू ऑक्सिजनची गरज पडणार नाही, त्यामुळे मृत्यूदरालाही लगाम बसेल, असेही टोपे म्हणाले.

केंद्र सरकारही मदत करणार

लसीकरणाच्या दररोजच्या उदिष्टासाठी आगामी काळात राजकीय प्रभावशाली व्यक्ती, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच धार्मिक गुरूंचाही समावेश करावा लागेल. याच अनुषगांने राज्याचे मुख्यमंत्रीही जनतेला संदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या मंत्रीमंडळानेही याबाबतचा ठराव मंजुर केला आहे. तसेच केंद्रातूनही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही या राष्ट्रीय लसीकरणासाठी लस कमी पडू देणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यांनीही लस पुरेपूर प्रमाणात देऊ असे टेलिफोनिक संभाषणात स्पष्ट केले आहे. लसीकरणाच्या मोहिमेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन,  खाजगी डॉक्टर, रोटरी, लायन्स क्लब , एनजीओ यांचीही मदत घेणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.