लहान मुलांच्या लसीकरणासाठी सरकार आग्रही, राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं...

राज्यात कोरोना विषाणूची संख्या आता कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारचा केंद्राकडे आग्रह असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे लसीकरण खूप अत्यंत असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.

११ ते २० वयोगट हा साधारणपणे पाचवी ते बारावी पर्यंतचा वयोगट आहे. राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लशीचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण करण्याचं नियोजन टोपेंनी केलं आहे. आता कॉलेज सुद्धा ओपन करण्यात आलेले आहेत. परंतु कॉलेज किंवा शाळेमध्ये विद्यार्थ्यी गेले असता तो संसर्ग हळूहळू पसरतो. त्याचा गुणधर्म सुद्धा तोच आहे.

गेल्या २० दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे आपण लहान मुलांना सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हॅक्सिन आणि लसीकरण केलं पाहीजे. असं मत टाक्स फोर्सने मांडलं आहे. महाराष्ट्राच्या वतीने आता आग्रही राहू की लवकरात लवकर मुलांचं लसीकरण करा.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसतेय. काल (रविवार) राज्यात ८४५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आढळून आली आहे. तर १७ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. त्याशिवाय, ७३० कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु राज्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्या ९ हजार ७९९ रूग्ण सक्रिय आहेत.


हेही वाचा: Legislative Council Election 2021 : काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर


मुंबईत गेल्या २४ तासांत २१३ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ७ लाखांच्या वर गेली आहे. तसेच रूग्णांचा दर ९७ टक्क्यांवर गेला आहे.