घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार, राजेश टोपेंची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार, राजेश टोपेंची माहिती

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. तर मुख्यमंत्री आता गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत वेगाने सुधारत असून लवकरच मुख्यमंत्री कामाला सुरुवात करतील असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यातील १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. उद्याच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री या प्रस्तावावर निर्णय घेतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थिती आणि शाळा सुरु करण्याच्या विषयावर माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत टोपेंना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर राजेश टोपे म्हणाले की, मला माहिती मिळाल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक आहे. मुख्यमंत्र्यांचे सध्या रुग्णालयातच फिजियोथेरेपीचे सेशन्स सुरु आहेत. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजियोथेरेपी देण्यात येत आहे. फिजियोथेरेपीचे सेशन्स पुर्ण झाल्याशिवाय कामाला सुरुवात करु नये असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची तब्येत वेगाने बरी होत असून लवकरच ते कामाला सुरुवात करतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री बैठकीला हजर राहणार

राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक आहे. या बैठकीमध्ये राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमध्ये वेगाने सुधारणा होत असून ते उद्याच्या बैठकीला रुग्णालयातून व्हिसीद्वारे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत १ ली ते ४ थीच्या शाळांबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

१ ली ते ४थीच्या शाळांना आरोग्य विभागाची परवानगी

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाल्या असल्यामुळे पुन्हा शाळा सुरु करण्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. ५ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु आता १ ली ते ४ थीच्या शाळा सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. चाईल्ड टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात शाळा सुरु करण्याबाबतचा चेंडू आला आहे. मुख्यमंत्र्यांसमोर शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Corona: कोरोना चाचण्या वाढवा! केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्रासह १३ राज्यांना पत्र


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -