Vaccination : तर ऑफलाईन पद्धतीनेही लस द्या, राजेश टोपेंच्या सूचना

Rajesh Tope

रस्त्यावर राहणारे लोक, भिकारी अशा प्रकारच्या कोणत्याच व्यक्ती कोरोना विरोधी लसीकरणापासून वंचित राहू नये, असे राज्य सरकारचे उदिष्ट आहे. अनेकदा बेघर लोकांकडे कोणतेच ओळखपत्र नसते. अशावेळी हे लोक वंचित राहू नये म्हणूनच कोविन एपमध्ये अशा प्रकारचे विशेष मॉड्यूल आहे. ज्यामध्ये ओळखपत्राशिवायही लस देण्यासाठीची तरतुद आहे. काहीच ओळख नसली तरीही अशा व्यक्तींना लसीकरण मोहिमेत समावेश करण्याची तरतूद आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम, सर्व्हर किंवा कनेक्टिव्हिटीचा प्राॉब्लेम असतो. त्यामुळे लसीकरण मोहिमेत ऑफ लाईन पद्धतीचाही समावेश करा अशाही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. (Rajesh tope give instruction for offline registration covid-19 vaccination)

काही तांत्रिक अडचणी असतील तर मॅन्युअल रजिस्ट्रेशन करून द्या, पण लसीकरण मोहिम थांबवू नका असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी, महिला बालकल्याण विभाग आणि जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत राज्यातील मिशन कवच कुंडल लसीकरण मोहिमेबाबत एक बैठक झाले. दिवसाला १५ लाख लसीकरण करण्याचे उदिष्ट हे ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्या डोसपासून वंचित असणारे ३ कोटी लोक लसीकरण मोहिमेचा भाग असणार आहेत. लस न घेतलेल्या व्यक्तींना लसीकरणासाठी प्राधान्य देऊन त्यांच्यातील अॅंटीबॉडी वाढवणे आणि कोरोनाची तिसरी लाट रोखणे हेच उदिष्ट असल्याचेही टोपे म्हणाले.

७२ तास सलग लसीकरण 

पिंपरी चिंचवड महापालिकेने नाविण्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यमातून ७५ तास सलग लसीकरण सुरू ठेवले. दिवस रात्री कधीही आपल्या सोयीनुसार लसीकरणाची सुविधा या पुढाकाराअंतर्गत देण्यात आली होती. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबतच ट्रान्सजेंडर, सेक्स वर्कर्स यांनाही प्राधान्याने या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याची कामगिरी या या पुढाकाराअंतर्गत करण्यात आली आहे. कोणताही घटक उपेक्षित राहू नये.


हेही वाचा – Mission Kavach Kundal : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’