घरताज्या घडामोडीखासदार राजीव सातव यांना सायटोमॅगीलो विषाणूचा संसर्ग, राजेश टोपे पुण्याला जाऊन घेणार...

खासदार राजीव सातव यांना सायटोमॅगीलो विषाणूचा संसर्ग, राजेश टोपे पुण्याला जाऊन घेणार भेट

Subscribe

या विषाणूचे इन्फेक्शन झाले असून त्यावर उपचार सुरु आहे. तज्ज्ञातील तज्ञ डॉक्टरांना बोलावून सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनावर उपचार घेताना त्यांची प्रकृती खालावली होती यामुळे त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. सातव यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. परंतु आता त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो विषाणूचा संसर्ग झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहेत. राजेश टोपे रविवारी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात जाऊन राजीव सातव यांची भेट घेणार आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले आहे. राजीव सातव यांची प्रकृती सुधारली असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. परंतु नंतर सातव यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर बसवण्यात आले आहे. सातव यांच्या शरिरात सायटोमॅगिलो विषाणू आढळून आला आहे. हा व्हायरस नवीन प्रकारचा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच आपण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, राजीव सातव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनावर मात केली असून आता बरे होत असताना त्यांच्या शरीरात सायटोमॅगिलो नावाचा नवा व्हायरस आढळला आहे. या विषाणूचे इन्फेक्शन झाले असून त्यावर उपचार सुरु आहे. तज्ज्ञातील तज्ञ डॉक्टरांना बोलावून सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टर सातव यांच्यावर उपचार करत आहेत. तसेच आपण स्वतः त्यांना भेटण्यासाठी रविवारी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात जाणार आहे. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -