ठराविक ठिकाणी रुग्णवाढ होत आहे, याचा अर्थ… – राजेश टोपे

Rajesh Tope reacted on increase number of corona patients
Rajesh Tope reacted on increase number of corona patients

देशात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ होत आहे. मात्र, महाराष्ट्रात मात्र चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे ओरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईत रुग्णवाढीची गती कमी असून काही ठराविक ठिकाणी रुग्णवाढ होत असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात १२५, १५० अशी रुग्णवाढ दिसत आहे. पण, रुग्णवाढीची गती कमी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा काही ठराविक जिल्ह्यांमध्येच ही वाढ दिसत आहे. याचा अर्थ चिंताजनक स्थिती आहे, चौथी लाट येणार असे नाही. महाराष्ट्रात तुलनात्मक तितके रुग्ण वाढत नाहीत. पण आपण लक्ष ठेवून आहोत. रुग्णसंख्या जास्त गतीने वाढली तर केंद्राच्या सूचनांनुसार उपाययोजना करु, असे राजेश टोपे म्हणाले.

आमची केंद्र सरकारसोबत बैठक झाली. त्यात देशातील सर्व आरोग्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते. आम्ही त्यावेळी नीती आयोग, आयसीएमआर यांच्यासोबत मोकळ्या मनाने चर्चा केली. यावेळी रुग्ण वाढत असलेल्या दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यांनी रुग्ण वाढत आहेत. मात्र, गंभीर आजार नाहीत. घरात विलगीकरणातच लोक बरे होतात अशी माहिती दिली. काळजी करण्याची गरज आहे इतकी ही वाढ नाही, असे राजेश टोपेंनी सांगितले.

महाराष्ट्रात तितके रुग्ण वाढलेले नाहीत. पण, आपण लक्ष ठेवून आहोत. रुग्णसंख्या जास्त गतीने वाढली तर केंद्राच्या सूचनांनुसार उपाययोजना करु, असे राजेश टोपे म्हणाले.