घरमहाराष्ट्रराजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवले; भुजबळांचा ओबीसी मेळाव्यात खळबळजनक दावा

राजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवले; भुजबळांचा ओबीसी मेळाव्यात खळबळजनक दावा

Subscribe

अंबड (जालना) : आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना अंतरवाली सराटी आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांवर लाठीचार्ज केले. यात आंदोलक जखमी झाले होते. या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे पाटील घरी पळून गेले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार म्हणून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी घऱातून उपोषणस्थळी आणले, असा दावा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या लाठीचार्जसंदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “लाठीचार्ज झाल्यानंतर सरदार ( मनोज जरांगे पाटील) घरात जाऊ बसले. यानंतर आमचे मित्र राजेश टोपे आणि रोहित पवार मनोज जरांगे पाटीलला घरातून रात्री तीन वाजता घेऊन आले. म्हटले की, उपोषणस्थळी बस तिकडे शरद पवार येणार आहेत. मग शरद पवार त्या ठिकाणी गेले. पण मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांना हे सांगितले नाही की, हा लाठीचार्ज का झाला”, असे छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – तुमच्या डोळ्यादेखत OBC आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर…; भुजबळांचा भाजपला थेट इशारा

शरद पवारांना माहिती असते तर…

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “शरद पवारांना मी आजही उत्कष्ठ प्रशासक समजतो. शरद पवारांना दाखविले असते की, पोलिसांवर हल्ला झाला आहे. तर हा वेळा मुद्दा निर्माण झाला असता. आज जी सहानभुती केली, ती गेली नसती. यात अनेकांच्या चूक आहे. जोशी नावाचा एसपी त्यांची देखील चूक आहे. त्यांना सांगायला हवे होते की, माझे पोलीस रस्त्यावर जखमी होऊन पडले आहेत आणि त्यांच्या अंगावर हात टाकले असताना मी काय करू.”

- Advertisement -

हेही वाचा – भुजबळ भावूक होऊन म्हणाले, ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC समाजावर संकट आलं नसतं’

गृहमंत्र्यांनी माफी मागितली

जालनाच्या लाठीचार्जनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माफी मागितली. यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीस विचारले की, तुम्ही गृहमंत्री आहात, तुमच्याकडे सगळी माहिती आहे. तुम्ही सांगायला हवे होते की, माझ्या पोलिसांवर मारहाण झाली. ते मी सहन करून शकत नाही. राज्य आणि देशापुढे हे खरे चित्र आले नाही. उलट पोलिसांना निलंबित करण्यात आले. गृहमत्र्यांनी माफी मागितली. आणि ज्यांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले आणि याचे (मनोज जरांगे पाटील) किती लांगुन चालन करायचे”, अशी अप्रत्यक्ष टीका छगन भुजबळांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -