घरताज्या घडामोडी'राजगृह' तोडफोड प्रकरणी एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरु

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरु

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील ‘राजगृह’ वर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुरुवारी एकाला अटक केली. तर मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे. उमेश सीताराम जाधव (३५) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. हा दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

हिंदू कॉलनीमधील राजगृहातील फुलझाडांची, कुंड्यांची मंगळवारी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. शिवाय दगडफेक करत राजगृहाच्या काचा फोडल्या. यासह सीसीटीव्ही कॅमेरे फोडून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर राजगृहाजवळ कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, काल माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं होतं मात्र त्याचा सहभाग आढळला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – राजगृहाजवळील बेस्टचा बस थांबा हलवला


पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली असता मुख्य आरोपी दगडफेक करत असताना दुसरा तरुण राजगृहाच्या परिसरात कुणी येत आहे का? यावर नजर ठेवत असल्याचं दिसलं. या फुटेजच्या आधारे माटुंगा पोलिसांनी परेल टीटी येथे बिगारी काम करणाऱ्या उमेश जाधव याला शोधून काढत त्याला ताब्यात घेतलं. उमेश याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने दिलेल्या माहीतीवरून मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही दगडफेक का करण्यात आली, यामागचे कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

- Advertisement -

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -