घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरराजपूत समाजासाठी यापुढे 'भामटा' शब्द वापरला जाणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

राजपूत समाजासाठी यापुढे ‘भामटा’ शब्द वापरला जाणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

सर्वाधिक राजपूत असताना त्यांना हे सहन करावे लागते हे चुकीचे आहे, असे रावल यांनी सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा भामटा शब्द वापरला जाणार नाही, याची घोषणा करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या विनंतीला दुजोरा दिला.

मागील अनेक दिवसांपासून राजपूत समाजसमोर लागलेला भामटा हा शब्द वगळण्याची मागणी केली जात आहे. रविवारी छत्रपती संभाजीनगरातील अयोध्यानगरी मैदानावर झालेल्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात जयकुमार रावल यांनी राजपूत समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लागणे दुर्दैवी आहे, असे सांगितले. देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणारे सर्वाधिक राजपूत असताना त्यांना हे सहन करावे लागते हे चुकीचे आहे, असे रावल यांनी सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा भामटा शब्द वापरला जाणार नाही, याची घोषणा करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या विनंतीला दुजोरा दिला. त्यामुळे आता आता राजपूत समाजापुढे भामटा शब्द लागणार नाही. (Rajput Community Bhamta Chief Minister Mughal Era Maharana Era Rajnath Singh)

या कार्यक्रमात “राजपूत समाज हा सुशिक्षित, उच्चशिक्षत आहे. राजकारणात देखील या समाजाचे प्रतिनिधित्व आहे. या समाजासमोर लागलेला भामटा हा शब्द वगळण्याची मागणी केली जात आहे. आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महासंमेलनातून मी भामटा राजपूत यातून भामटा हा शब्द वगळण्याची घोषणा करतो. राज्य सरकार लवकरच या संदर्भातला प्रस्ताव केंद्राकडे पाठवेल”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, महाराणा प्रताप यांच्या समर्पणाची आठवण ठेवून यापुढे मुघल काळ न म्हणता महाराणा काळ म्हणायला हवे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

रविवारी (१४ मे) छत्रपती संभाजीनगरातील अयोध्यानगरी मैदानावर वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती. या संमेलनाचे प्रास्ताविक करताना जयकुमार रावल यांनी राजपूत समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लागणे दुर्दैवी आहे, असे सांगितले.

देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणारे सर्वाधिक राजपूत असताना त्यांना हे सहन करावे लागते हे चुकीचे आहे, असे रावल यांनी सांगितले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशा प्रकारे राजपूत समाजासाठी भामटा हा शब्द वापरणे हीच भामटेगिरी आहे. यापुढे हा शब्द वापरला जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी विनंती केली. यावर एकनाथ शिंदे यांनीदेखील याला दुजोरा देत तत्काळ याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

- Advertisement -

याशिवाय, राजपूत समाजासाठी स्वतंत्र महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. या सगळ्या मागण्यांसाठी पुढील १५ दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


हेही वाचा – मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव; मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -