घरताज्या घडामोडीRaju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी, राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत...

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी, राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय

Subscribe

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बैठक आज कोल्हापुरात पार पडली. यावेळी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पूरग्रस्तांच्या निधीबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रात यापूर्वी जसे साखर घोटाळे झाले तसे जलविद्युत केंद्रांबाबत होणार आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेबांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही, असं शेट्टी म्हणाले.

देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी

२४ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी अमरावतीमधून केली होती. देवेंद्र भुयारबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही, असा घणाघात शेट्टी यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, राजू शेट्टी यांचे समर्थक रविकांत तुपकर यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकला होता. मात्र, अवघ्या २० दिवसांतच त्यांनी घरवापसी केली होती.


हेही वाचा : IPL 2022: आजच्या सामन्याला ग्लेन मॅक्सवेल मुकणार, आरसीबीच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -