घरमहाराष्ट्र"एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ", CM च्या अयोध्या दौऱ्यावरून 'या' नेत्याची टीका

“एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ”, CM च्या अयोध्या दौऱ्यावरून ‘या’ नेत्याची टीका

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळासह अयोध्या दौऱ्यावर होते. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलंय. यात आता आणखी एका नेत्यानं एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतलाय.

महाराष्ट्रावरील अवकाळीचं संकट काही संपण्याचं नाव घेत नाही. आधीच पडलेला अवकाळी आणि पिकाला कमी भाव यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर आता अवकाळी आणि गारपीट अशा दुहेरी संकट कोसळलंय. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळासह अयोध्या दौऱ्यावर होते. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलंय. यात आता आणखी एका नेत्यानं एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतलाय.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजीपाला, गहू, मका, कलिंगड अशी पीकं अवकाळीच्या तावडीत सापडल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा प्रश्न पडला आहे. शेतकरी संकटात असतानाही मुख्यमंत्री काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले. त्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच खडेबोल सुनावलेत. “शेतकऱ्यांची अवस्था ही आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी झाली असून एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे, असा टोला यावेळी राजू शेट्टींनी लगावलाय.

- Advertisement -

हे ही वाचा: CM एकनाथ शिंदे अयोध्येवरून थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर, बळीराजाने मांडली व्यथा

यापुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “मुख्यमंत्रीसाहेब प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल तर खुशाल घ्या, ही तुमची व्यक्तीगत बाब आहे. मात्र, राज्य प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आपण गेलेला आहात, त्या प्रभू रामचंद्रानं आपल्या प्रजेला हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे. म्हणून आजही जनता रामराज्य आलं पाहिजे असं म्हणते. तुमच्या राज्यात रामराज्य निर्माण करायचं असेल तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या. एवढीच कळकळीची विनंती आहे.”

- Advertisement -

हे ही वाचा: शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येत, जयंत पाटलांची टीका

यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. सरकारकडून अजून पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे हे पंचनामे कधी होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोंबरमधील मदत अजून मिळाली नाही, तरीही हे सरकार अयोध्येच्या दौऱ्यामध्ये मश्गूल असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -