घरताज्या घडामोडीस्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील कार्यकारिणी बरखास्त

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील कार्यकारिणी बरखास्त

Subscribe

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील सर्व पदे बरखास्त केली आहेत. सोलापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली. यापुढे दोन वर्षांसाठी राज्यभरातील पदाधिकारी यांची एकाचवेळी नेमणूक केली जाईल. तसेच विभागीय, राज्य पातळीवर शिस्तपालन समिती कार्यरत होणार आहे, अशी माहिती देखील राजू शेट्टी यांनी दिली.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, “आता गाव पातळीपासून ते प्रदेश पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. दर दोन वर्षांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची बदली करण्यात येईल. ज्या कार्यकर्त्यांचे काम चांगले असेल त्यांना कायम ठेवले जाईल.” पुढच्या एका महिन्यात सर्व पदाधिकारी नेमले जाणार आहेत.

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून फुटून सदाभाऊ खोत यांनी स्वतःची रयत क्रांती नावाची संघटना स्थापन केली. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी मंत्रीपदही उपभोगले. मध्यतंरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी देखील सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. मात्र काही महिन्यांच्या आतच त्यांची घरवापसी झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर वाढविण्यासाठी आणि तरुणांना संधी देण्याचे काम नव्या कार्यकारणीद्वारे केले जाणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -