Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गोकुळ संघ निवडणुकीत राजू शेट्टींच्या निर्णयाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना धक्का

गोकुळ संघ निवडणुकीत राजू शेट्टींच्या निर्णयाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना धक्का

लॉकडाऊनच्या काळात गोकुळने दूध उत्पादकांना चांगली मदत केली

Related Story

- Advertisement -

गोकूळ मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयावरुन राजकीय पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांचा गोकूळ मल्टिस्टेट करण्याला विरोध आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांना राजू शेट्टींच्या निर्णयाचा चांगलाच धक्का बसण्याची शक्यता आहे. गोकुळ मल्टिस्टेट करण्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाला पाठिंबा देत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच गोकुळळे लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांना चांगली मदत केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात गोकुळने दूध उत्पादकांना चांगली मदत केली आहे. परंतु गोकुळ मल्टिस्टेट करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विरोध आहे. गोकुळमुळे जिल्ह्यात दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळालं आहे. दुध दराबाबत अनेकदा आंदोलनं करण्यात आली आहे. परंतु गोकुळ मल्टिस्टेट न करण्याच्या निर्णयाला आमचा सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या गटाला पाठिंबा असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. गोकुळ मल्टिस्टेट करण्यावरुन आणि गोकुळ संघ निवडणूकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात येत्या २ मेला गोकुळ दूध संघासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी तालुका पातळीवर निवडणुक घेण्यात येत आहे. एकूण ३५ केंद्रांवर मतदान करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे गर्दी होऊ नये यासाठी मतदान केंद्र विभागली गेली आहेत. मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. २ मे रोजी मतदान घेतल्यानंतर ४ मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -