Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ...तर राष्ट्रवादीचा मीच करेक्ट कार्यक्रम करेन; राजू शेट्टींचा इशारा

…तर राष्ट्रवादीचा मीच करेक्ट कार्यक्रम करेन; राजू शेट्टींचा इशारा

Related Story

- Advertisement -

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावातून राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. ठरलेला समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवायचं आहे. ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. राजू शेट्टी यांचं नाव वगळण्यात आल्याची चर्चा सुरु असून त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशारा राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला दिला.

- Advertisement -

मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं म्हणून मला डावललं गेलं, असा दावा त्यांनी केला. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवावं

राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवावं, असा इशारा दिला. आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. हा समझोता पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचं हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisement -