आमचा दसरा कडवट केल्यास मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टींचा इशारा

एफआरपीचे तुकडे खपवून घेतलं जाणार नाही

Raju Shetti's warning state government If Dussehra is made bitter Diwali will not be sweet
आमचा दसरा कडवट केल्यास मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही - राजू शेट्टींचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शतेकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी द्यावी असी राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे. जर शेतकऱ्यांचा दसरा कडवट झाला तर महाविकास आघाडी सरकारमधील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. एफआरपीच्या मुद्द्यावरुन येत्या ७ ऑक्टोबरला राज्यभरात जागर एफआरपीचा असं आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा देखील राजू शेट्टी यांनी केली आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना अद्याप भरीव मदत मिळाली नसून या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी एफआरपीच्या मुद्दयावरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारविरोधात येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यभरात एफआरपीचा जागर म्हणून आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन शक्तिस्थळापासून सुरु करण्यात येणार आहे. राज्य सरकारने अद्यापर पूरबाधित नुकसानग्रस्तांना मदत करण्यात आली नाही. जर आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे.

एफआरपीचे तुकडे खपवून घेतलं जाणार नाही

राज्य सरकार आणि केंद्र सरकार एफआरपीचे तुकडे करण्याचे कटकारस्थान करण्यात येत आहे. एफआरपीचे तुकडे खपवून घेतले जाणार नाही. एफआरपीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन कोरोना नियमांचे पालन करुन करण्यात येईल असे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच स्वाभिमानी संघटना झोपली असा गैरसमज करुन घेऊ नका असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

संकटांवर काहीतरी उपाय झाला पाहिजे

कोल्हापूर जिल्ह्यात ५६ पुल, सांगलीत ४८ आणि शेजरारच्या कर्नाटक जिल्ह्यात १६ असे १२० पुलं पुरपरिस्थितीला कारणीभूत ठरत आहे. कर्नाटक जिल्ह्यातील मांजरीच्या पुलामुळे कृष्णेचे पाणी पुढे सरकत नाही आहे. याचा फटका बसत आहे. मानवनिर्मित संकटांवर काहीतरी उपाय झाला पाहिजे. काही मंत्र्यांनी मत व्यक्त केले आहेत त्याच्यावर काही बोलत नाही. संरक्षण भींत बांधली तरी शहरे वाचतील मात्र खेडी वाचणार नाहीत असे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : राज्यात अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमिनींचं नुकसान, ८१ टक्के पंचनामे पूर्ण – वडेट्टीवार